चांगल्यासाठी कितीही गुन्हे दाखल होऊ देत ! संजय गायकवाड यांनी ठणकावले
Sanjay Gaikwad Controversial statement : मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरु आहे. राज्य सरकारने प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या वर्गामध्ये हिंदी भाषा विषय पर्यायी देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरुन शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले दिसून आले. दोन्ही नेत्यांची एकत्रितपणे विजयी सभा पार पडल्यानंतर सत्ताधारी महायुतीने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर आता शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची टीका करताना जीभ घसरली आहे.
ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. भाषा शिकवण्यावरुन महायुतीचे समर्थन करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. यावरुन आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लातूर येथील हाडोळती येथे संजआमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, केवळ हिंदीचा विषय नाही. परराज्यात गेल्यावर हिंदी भाषा तुम्ही बोलणार नाहीत का? तुम्हाला जगात टिकायचं असेल तर, सगळ्याच भाषा अवगत असायला हव्यात. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काय मूर्ख होते का? असे विधान शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी केले आहे
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये अनिवार्य करण्यावरुन वाद सुरु झाला आहे. यामध्ये आता आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटावर टीका करताना गंभीर वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आणि इतिहासामधील महत्त्वाच्या व्यक्तीची नावे घेत संजय गायकवाड यांनी बेताल वक्तव्य केले आहे. यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढे ते म्हणाले की, भाषेवरून राजकारण करणं चुकीचं आहे. जर पाकिस्तानचा दहशतवाद रोखायचा असेल तर उर्दू भाषा पण आपल्याला यायला हवी. भाषेवरून राजकारण करणं चुकीचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याने संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार संजय गायकवाड हे शिवसेना शिंदे गटामध्ये असून त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. मात्र हे करताना बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले की, संजय गायकवाड यांनी ठाकरे नावाचा ब्रँड राहिला नसल्याचे म्हटले आहे. असा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे असतानाच 288 आमदार निवडून आले असते. त्यावेळी 70 ते 74 जागा निवडून आल्या असता, असा घणाघात गायकवाड यांनी केला. मात्र त्यांनी अप्रत्यक्षपणे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.