Shivsena Thackeray group Mama Rajwade joins BJP Nashik political news
नाशिक : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेचा बालेकिल्ला राखण्यासाठी तसेच राज्यातील महापालिका अन् जिल्हापरिषदेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी नाशिकमध्ये देखील ठाकरे गटाने रणनीती आखण्याचा प्रयत्न केला. मात्र नाशकात ठाकरे गटाला गळती लागली आहे. नेते आणि पदाधिकारी महायुतीची कास धरत आहेत. अवघ्या आठवड्याभरापूर्वी पदभार स्वीकारलेले मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.
नाशिकमध्ये राजकीय चर्चांना आणि हालचालींना वेग आला आहे. मागील महिन्यांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नाशिक दौरा केला होता. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत आढावा देखील घेतला होता. मात्र संजय राऊत यांची पाठ फिरताच पक्षाला गळती लागली. अनेकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटामध्ये प्रवेश केला. याचबरोबर आता ठाकरे गटाला नाशिकमध्ये सुरुंग लावण्यात भाजपला देखील यश आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिकमध्ये महाविकास आघाडीची ताकद कमी होताना दिसत आहे. शरद पवार गटाचे माजी सभापती गणेश गीते, नाशिक महापालिकेतील नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे, माजी नगरसेवक कान्नू ताजमी, तसेच ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विकासकामांसाठी आणि निधीच्या अडचणीमुळे हा पक्षप्रवेश होत असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
यानंतर आता मामा राजवाडे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मामा राजवाडे यांच्या भरवश्यावर ठाकरे गट निवडणुकीसाठी तयारी करत होता. अवघ्या आठवडाभरापूर्वी मामा राजवाडे यांनी ठाकरे गटाचा पदभार स्वीकारला होता. आठवडाभरापूर्वीच मामा राजवाडेंची महानगर प्रमुख पदी नियुक्ती झाली होती. तर नाशिकमधील तीन नगरसेवक आज भाजपात प्रवेश करत आहेत. याचबरोबर ठाकरे गटाचे जिल्हा संघटक बाळासाहेब पाठक, उपजिल्हा प्रमुख गुलाब भोये, उपजिल्हा प्रमुख कन्नु ताजने, युवसेना विस्तारक शंभु बागुल, श्रमिक सेना जिल्हा प्रमुख अजय बागुल हे देखील भाजपमध्ये प्रवेश करार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाला नाशिकमध्ये धक्का मिळाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे की, भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे: नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकारायांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले.हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले… क्लायमॅक्स असा की:: हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही! असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला आहे.
भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे:
नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकारायांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले.हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…
क्लायमॅक्स असा की::
हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत…— Sanjay Raut (@rautsanjay61) July 3, 2025