Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे…; इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंना शेवटचे स्थान, शिंदेंच्या गटाने डिवचले

Uddhav Thackeray Last Seat : इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शेवटच्या रागांमध्ये बसल्यामुळे जोरदार टीका केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 08, 2025 | 12:03 PM
shivsena uddhav thackeray and aaditya thackeray at last seat in india alliance deli meeting

shivsena uddhav thackeray and aaditya thackeray at last seat in india alliance deli meeting

Follow Us
Close
Follow Us:

Uddhav Thackeray Last Seat : नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीतील सुनहरी बाग रस्त्यावरील शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’तील पक्षनेत्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले होते. मात्र त्यांच्या बैठकीच्या जागेवरुन वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

आगामी निवडणुकीच्या संदर्भात इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण नेते सहभागी झाले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप गट) अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, द्रमुकच्या नेत्या कनिमोळी, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे, सपा नेते अखिलेश आणि रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती, डाव्या आघाडीचे डी. राजा नेते राहुल गांधी यांच्या घरी उपस्थित होते. यावेळी ठाकरे सातव्या रांगेत बसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना शेवटचे स्थान दिले गेले असल्याची टीका शिंदे गटाकडून केली जात आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन जोरदार टीका केली आहे. केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे, “उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, तेव्हा त्यांना आणि ‘मातोश्री’ला किती सन्मान होता. देशातील भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते मातोश्रीवर जाऊन सन्मान करत. 2019 लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते. कट टू 2025, आता पहा, महाविकास आघाडीत आल्यापासून राहुल गांधी, सोनिया गांधी कुणी मातोश्रीवर गेले? उत्तर नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आंदरांजली वाहण्यास कुणी काँग्रेस नेता गेला? उत्तर नाही. बाळासाहेब ठाकरेंचा काँग्रेसने हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला? उत्तर नाही. दरवर्षी आता उद्धव ठाकरेच दिल्लीत राहुल सोनिया गांधींना भेटायला जातात. हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली, त्यातून मान गेला, सन्मान गेला, हातात पडलं काय? आता तर काय बैठकीत अपमानाची थेट शेवटची रांग”” अशी टीका केशव उपाध्येंनी केली आहे.

भाजपासोबत उध्दव ठाकरे होते, किती सन्मान होता मातोश्री व उध्दव ठाकरे यांना…

देशातील भाजपाचे अनेक महत्वाचे नेते मातोश्री वर जाऊन सन्मान करीत.

२०१९ लोकसभा निवडणूकीच्या वेळी अमित शाह मातोश्रीवर आले होते.

कट टू २०२५

आता पहा
महाविकास आघाडीत आल्या पासून राहूल गांधी, सोनिया… pic.twitter.com/EqiMBuvZ5g

— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 8, 2025

शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे… शिवरायांचा वारसा सांगता ना रे…खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे???? बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला  अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे?? असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “काँग्रेस ने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे….तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे… थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे… महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली. ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे…,” असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.

आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…
#शिवरायांचा वारसा सांगता ना रे…
खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन
शेवटच्या रांगेत बसलात रे????#बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला
अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला
तुम्ही यातलं… pic.twitter.com/9pr7sDwwqX

— Naresh Mhaske (@nareshmhaske) August 8, 2025

Web Title: Shivsena uddhav thackeray and aaditya thackeray at last seat in india alliance deli meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • INDIA Alliance
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज
1

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर
2

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
3

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक
4

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.