mns raj thackeray and shivsena uddhav Thackeray for marathi language morcha
मुंबई : राज्यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेवरुन वाद निर्माण झाला आहे. महायुती सरकारने प्राथमिक शाळांमध्ये त्रिभाषिक सूत्र लागू करत हिंदी भाषा पर्याय म्हणून ठेवली आहे. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. हिंदी भाषा अनिवार्य नसली तरी पर्यायी केल्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच यासाठी उद्धव ठाकरे हे देखील मैदानात उतरले आहेत. यामुळे मराठी भाषेच्या आग्रहासाठी ठाकरे बंधूंचे एकमत झाल्याचे दिसून आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मराठी भाषेच्या संदर्भात बैठक पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार तसेच समन्वय समिती यांच्यासोबत बैठक घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषेला विरोध नाही मात्र सक्ती आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. मराठी भाषेची सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. त्यापूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे दाखल झाले होते. सरकारची भूमिका मांडण्यासाठी दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. मात्र यामध्ये देखील राज ठाकरे यांचा मराठी भाषेसाठी भूमिका ठाम राहिली आहे. राज ठाकरे यांनी त्या भेटीनंतर साधलेल्या संवादामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांना सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
कोणताही झेंडा न घेता मराठी साठी एक व्हा !
रविवार, ६ जुलै, २०२५
सकाळी १० वा.
स्थळ : गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, मुंबई#मोर्चा_मराठीचा #मराठी #महाराष्ट्र #राजठाकरे #MNSAdhikrut pic.twitter.com/ocxYTJgya3— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 26, 2025
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ६ जुलै रोजी गिरगावमध्ये रोजी मराठी माणसांचा हा मोर्चा गिरगावहून निघेल अशी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार, नाट्यकलाकार, लेखक, साहित्यिक तसेच सर्व मराठी माणसांनी सहभागी व्हावे असे मत राज ठाकरे यांनी मांडले आहे. येत्या 6 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा राज ठाकरे यांच्या पक्षाचा भव्य मोर्चा असणार आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी देखील हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात येत्या 29 जून रोजी जाहीर सभा घेणार आहेत. यावेळी राज्य सरकारने हिंदी भाषेच्या काढलेल्या आदेशाची जाहीर होळी केली जाणार आहेत.
तमाम मराठी माणसांना मी आवाहन करतो;
पक्षीय भेदाभेद विसरून, मराठी भाषेच्या लढ्यात सामील व्हा! pic.twitter.com/5xmNLMkioo— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 26, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे यांच्याप्रमाणे मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे यांनी देखील मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मोर्चा हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी असणार आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, “पक्षीय भेदाभेद विसरुन मराठी भाषेसाठी मी सर्वांना एकत्र लढा देण्याचे आवाहन करतो. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, खेळाडू, साहित्यिक असा सर्व क्षेत्रातील लोकांनी मराठी भाषेसाठी एकत्र आलं पाहिजे. ज्याच्या मनामध्ये मराठी भाषा आहे. ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा सर्वांनी यामध्ये सहभागी झाले पाहिजे. भाजपमधील सुद्धा अस्सल मराठी माणसं सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात, असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधू हे मैदानामध्ये उतरल्याचे दिसून येत आहे.