Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : मुलीच्या मृत्यूचे राजकारण तिच्या वडिलांनी करु नये; सतीश सालियान यांना संजय राऊतांचा सल्ला

राज्यामध्ये दिशा सालियान प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मात्र तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये आले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी राजकारण करु नये असे संजय राऊत म्हणाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 28, 2025 | 10:39 AM
mp sanjay raut target cm devendra fadnavis and raj thackeray meet political news

mp sanjay raut target cm devendra fadnavis and raj thackeray meet political news

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले असून यामध्ये उपयुक्त विषयांवर चर्चा न झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर विरोधक सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला आहे. दरम्यान, राज्यात दिशा सालियान हे प्रकरण चर्चेत आहे. पाच वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या दिशा सालियानच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलघडलेले नाही. या प्रकरणामध्ये दिशाचे वडील सतीश सालियान यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार होऊन तिची हत्या केल्याचा धक्कादायक दावा केला होता. याबाबत त्यांनी मुंबई हाय कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील सत्ताधारी आरोप करत आहेत. मात्र दिशा सालियान हिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सतीश सालियान यांनी राजकारण करु नये, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सौगात-ए-मोदी हे भाजपचं एक ढोंग

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ईदच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सौगात-ए-ईद दिली जाणार आहे. यावर राऊतांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “निवडणुकीच्या प्रचारामध्ये देशातील मुस्लीम बांधवांबाबत आपण काय नाही बोललात? मोदींनी त्यांच्या लोकांची भाषणे पुन्हा एकदा ऐकली पाहिजेत. हे घुसखोर लोक आहेत..हे मंगळसूत्र चोरणारे आहेत अशी टीका केली. मात्र आता सौगात-ए-मोदी हा उपक्रम भाजपचं एक ढोंग आहे,” असा घणाघात खासदार राऊत यांनी केला.

महाराष्ट्रसंबधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे खासदार राऊत यांनी दिशा सालियान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे. तो तर आम्ही काढलेला नाही ना. त्यामुळे तिच्या वडिलांनी राजकारण करु नये. आमच्यासाठी हे प्रकरण बंद झाले आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण त्यांनी करु नये. जे खरं आहे तेच समोर आहे. दिशा सालियान हिच्या घरी काही अडचण होती का? त्यांच्याकडे पैशांची चणचण होती का? याबाबत आम्हाला माहिती नाही. हा त्यांचा कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर आम्हाला राजकारण करायचं नाही,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत

खासदार संजय राऊत म्हणाले की, “जे आता तिच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर तिच्या वडिलांना हाताशी धरुन राजकारण करत आहेत ते त्यांना लखलाभ होवो. पोस्टमार्टम रिपोर्ट काही दिवसांपूर्वी आला आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे समर्थ आहेत. अशा घाणेरड्या विषयांचं राजकारण करुन जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करु इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात. आम्ही बाळासाहेबांचे विचारवाहक असल्याचे म्हणतात. अशा खाणेरड्या प्रकरणाचं राजकारण करताना त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत हे करताना,” असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला आहे.

Web Title: Shivsenasanjay raut live said dont do politics on disha salian death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian case
  • MP Sanjay Raut

संबंधित बातम्या

‘ही बॅटरी लवकरच संपणार कारण…’; पुण्यात पोस्टरबाजी करत शिवसेनेची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका
1

‘ही बॅटरी लवकरच संपणार कारण…’; पुण्यात पोस्टरबाजी करत शिवसेनेची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

ही चड्डी बनियान गँग! आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून निलेश राणे सभागृहातच भिडले, म्हणाले, हिंमत असेल तर…
2

ही चड्डी बनियान गँग! आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरून निलेश राणे सभागृहातच भिडले, म्हणाले, हिंमत असेल तर…

बनियानवर आले थेट लगावली कानशिलात; संजय गायकवाड यांचा कॅन्टीन चालकाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
3

बनियानवर आले थेट लगावली कानशिलात; संजय गायकवाड यांचा कॅन्टीन चालकाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

“त्यांचा रडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रभर सुरू…; खासदार संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांचा घेतला खरपूस समाचार
4

“त्यांचा रडण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रभर सुरू…; खासदार संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांचा घेतला खरपूस समाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.