
Solapur Municipal Corporation announces leaving reservation local body elections 2025
Maharashtra Local Body Elections : सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे बहुप्रतिक्षित आरक्षण जाहीर झाले असून यामुळे अनेक इच्छुकांची ‘कहीं खुशी कहीं गम’अशी अवस्था झाली. महानगरपालिका आरक्षणावरच आगामी राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने इच्छुकांचे लक्ष आरक्षणाकडे लागले होते. आगामी सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकांसाठी शहरातील सर्व प्रभागातील आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी या आरक्षणांबरोबर महिलांच्या आरक्षणांचा समावेश आहे.
हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी ११ वाजता लॉटरी सोडत तसेच आयोगाचे दिशानिर्देशद्वारे हे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी नागरिक उपस्थित होते. पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. आरक्षण सोडती वेळी इच्छुकांचे अनेक प्रभाग महिला किंवा जातनिहाय आरक्षणामध्ये अडकले गेले. विशेषतः खुल्या गटातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना आलेलं आरक्षण आपल्यावर राजकीय गंडांतर आल्याचं वाटू लागलं आहे. त्यामुळे अनेकांवर नवे प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोलापूर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी एकूण २६ प्रभागांमध्ये १०२ सदस्य निवडायचे आहेत. यातील १५ जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. त्यातील ८ महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी २ जागा असून यातील १ महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २७ जागा आरक्षित असून यातील१४ महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. सर्वसाधारण गटामध्ये ५८ जागा असून यातील २८ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या. आरक्षणासह महिलांसाठी एकूण ५१ जागा आरक्षित झाल्या आहेत. सोलापूर महानगर पालिकेच्या एकूण २६ प्रभागापैकी १ ते २४ प्रभाग हे चार सदस्य आहेत तर २५ आणि २६ क्रमांक हे प्रभाग तीन सदस्य आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून बैठकांमधून रणनीती ठरवण्यात येत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रभागनिहाय पडलेले आरक्षण