State Women's Commission Chairperson Rupali Chakankar has a clear opinion on resignation.
नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या सध्या जोरदार चर्चेमध्ये आल्या आहेत. पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये तप्तरतेने भूमिका आणि कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. वैष्णवी हगवणे हिची जाऊ मयुरी हगवणे हिने तिच्यावर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावर योग्य ती कारवाई न झाल्याने विरोधातील सर्व महिला नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत आता चाकणकर यांनी स्पष्टच शब्दांमध्ये सुनावले आहे.
रुपाली चाकणकर यांनी जनसुनावणी घेत महिलांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अनेक महिलांसंबंधित अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “कोणत्याही कुटुंबाची तक्रार आली तर ती सामोपचाराने मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण कुटुंब समाजाचा पाया आहे. कुटंब एकत्र आणण्यासाठी कुटुंबात संवाद घडवून आणणं, गैरसमज दूर करणं, यासाठी कायद्याच्या तरतुदीतील तीन काऊन्सिलिंग होणं गरजेच असतं” असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण आरोपपत्र दाखल करताना कोणामुळे दिरंगाई झाली? यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार आहे. जिल्ह्यात महिला केंद्र असतात. लोकांचा गैरसमज होतो, त्यांना हा आयोग आहे असं वाटतं. त्या तक्रारी त्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या असतात,” असे देखील मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.
न्याय देण्यासाठी आम्ही बांधिल
त्याचबरोबर भाजप नेते परिणय फुके यांच्या भावाची बायको प्रिया फुके यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रिया फुके यांना धमकी दिली जात असून त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “परिणय फुकेंसंदर्भात कोणतीही तक्रार आयोगाला मिळालेली नाही. मीडियामधून आम्हाला त्या संदर्भात जे व्हिडिओ मिळाले, त्यावर नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तुम्ही काय केलय ते कळवा असं सांगितलं. आयोगातून संबंधित पीडित महिलेला चार ते पाचवेळा फोन केला. ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत, त्याची माहिती असण्याचं कारण नाही. तक्रारदाराने पाठपुरावा जरुर करावा, तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही बांधिल, कटिबद्ध आहोत,” असे मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर महिलांवर अत्याचार वाढले असल्याचे आरोप करुन रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. याबाबत चाकणकर म्हणाल्या की, “आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. कोणीतही तक्रार देताना स्थानिक पोलीस स्टेशनला द्या. त्यानंतर बरोसा सेल आणि कौटुंबिक संरक्षण न्यायालयात तक्रार द्या, तिथे न्याय मिळाला नाही, तर महिला आयोग आहेच. “कुटुंब व्यवस्था हा समाजाचा पाया असल्याने कुटुंबासंदर्भात कोणतीही तक्रार आली, तर लगेच टोकाची भूमिका घेता येत नाही. न्यायप्रकिया कुटुंब एकत्र करण्यावर भर देते. जोडणं हे काम आहे, तोडणं नाही. पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो, राजीनामा मागणं ही विरोधकांची भूमिकाच असते,” असे स्पष्ट मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.