Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS News: निवडणुकीतील जाती-आधारित विश्लेषण थांबवा; RSS देशातील राजकीय पक्षांना मोठे आवाहन

संघटनात्मक विस्तारासोबतच संघ समाजात गुणवत्तेचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे. भारतीयत्व किंवा हिंदुत्व ही केवळ एक विचारसरणी नसून ती एक जीवनशैली आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 16, 2026 | 02:11 PM
RSS Representative Meeting 2026,

RSS Representative Meeting 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • हिंदुत्व ही केवळ विचारसरणी नसून जीवनशैली आहे- सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे
  • जातीय भेदभाव संपवण्यासाठी संघ मैदानात
 

Chandigad News: जाती-आधारित भेदभाव संपवण्याचे आणि निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या लोकसंख्येचा जाती-आधारित विश्लेषणाचा सराव थांबवण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. तीन दिवसांच्या अखिल भारतीय प्रतिनिधी बैठकीत देशभरातील १,४८९, प्रतिनिधींसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सांगितले की, संघ सामाजिक सलोख्याचे समर्थन करतो आणि समाजाला जातीच्या आधारावर विभागण्याच्या प्रयत्नांना विरोध करतो.

केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक

होसाबळे यांनी सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीत केंद्र सरकारच्या राजनैतिक प्रयत्नाचे कौतुक केले आणि म्हटले की, संघ जागतिक शांतता आणि विकासाचा समर्थक आहे, होसबळे यांनी इराणबाबत भारताच्या भूमिकेयर भाष्य करताना सांगितले की, भारताच्या हितासाठी सरकार योग्य तेच करत आहे आणि सरकारची भूमिका योग्य आहे, असा विश्वास व्यवत्त केला.

Co-operative Bank Regulation: प्रस्थापित नेत्यांची सत्ता धोक्यात; जिल्हा बँकांसाठी ‘सक्तीची निवृत्ती’चा नवा

हिंदुत्व केवळ विचारसरणी नव्हे, तर एक जीवनशैली

होसाबळे म्हणाले की, संघटनात्मक विस्तारासोबतच संघ समाजात गुणवत्तेचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे. भारतीयत्व किंवा हिंदुत्व ही केवळ एक विचारसरणी नसून ती एक जीवनशैली आहे आणि या जीवनशैलीच्या माध्यमातून समाजात गुणवत्तेचा विस्तार झाला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, समाजाने महापुरुषांच्या कार्याचा विचार करताना जाती आणि पंथाच्या भेदांच्या वर उठून त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या कार्याद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तनासाठी पुढे पाऊल उचलले पाहिजे.

 

संघात सर्वांचे स्वागत

संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी कोणा एका विशिष्ट समुदायाचा किवा पंथाचा विरोध करण्यासाठी ही संघटना स्थापन केली नव्हती. सकारात्मक सामाजिक बदलासाठी ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना राबवून समाजाचे जीवनमान आणि चारित्र्य उंचावण्यावर भर दिला जात आहे. संघात सर्वांचे स्वागत आहे, जो कोणी समाजासाठी चांगले कार्य करत आहे, त्याला आम्ही संघाचा स्वयंसेवकच मानतो, असे होसबळे म्हणाले.

Pune Crime: सासरी पैशांसाठी छळ; लोणीकंदमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा

विकेंद्रीकरणावर चर्चा

संघाच्या संघटनात्मक रचनेबाबत त्यानी सांगितले की, रचनेच्या विकेंद्रीकरणावर चर्चा झाली आहे. यामध्ये ‘प्रात’ ऐवजी ‘संभाग’ नावाचे छोटे विभाग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव लागू झाला, तर सध्याच्या ४६ प्रांतांच्या ऐवजी ८० हून अधिक संभाग (क्षेत्रे) निर्माण होतील.

 

 

Web Title: Stop caste based analysis in elections rss appeals for social harmony at chandigarh meet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • hindu-muslim politics
  • RSS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.