Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुधीर मुनगंटीवार पुन्हा नाराज? ‘ही’ मागणी मान्य न झाल्याने महायुती सरकारची थेट केली इंग्रजांशी तुलना, चर्चांना उधाण

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचे हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी तीन किंवा चार आठवड्यांचे घेण्याची मागणी केली आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव याच अधिवेशनात मंजूर करावा, अशी मागणी करत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2026 | 09:00 PM
sudhir-mungantiwar upset in bjp comapre mahayuti with british government-maharashtra-politics

sudhir-mungantiwar upset in bjp comapre mahayuti with british government-maharashtra-politics

Follow Us
Follow Us:
  • सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याने ते भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा
  • महायुती सरकारची ब्रिटीश सरकारशी केली तुलना
  • हिवाळी अधिवेशनचा कालावधी वाढवण्याची केली मागणी
Sudhir Mungantiwar upset within BJP : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी त्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्याने ते नाराज असल्याचे उघड झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा मुनगंटीवार यांनी सरकारविरोधात भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरमध्ये होत असते. त्याच पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी अधिवेशनाचा कालावधी वाढवून, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत करण्यात आली. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रह धरला होता मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी? सोनिया गांधींच्या पुस्तकाऐवजी फाडला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो

अधिवेशन दोनऐवजी तीन आठवड्यांचे घ्यावे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी तीन किंवा चार आठवड्याचं घ्यावं अशी मागणी केली. जर असं केलं नाही तर सावरकरांनासुद्धा न्याय मिळू शकत नाही, असे म्हणत सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भातील विषयाकडे सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. तसेच, इंग्रजांपेक्षा आपलं सरकार वाईट आहे असा मेसेज जाऊ नये म्हणून अधिवेशन कालावधी वाढवून आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव देखील याच अधिवेशनात मंजूर करुन घ्यावा, अशी मागणी देखील सुधीर मुनगंटीवर यांनी केली.

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”

मात्र यावेळी त्यांनी महायुती सरकारची तुलना थेट इंग्रजांशी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे भाजपमध्ये सुधीर मुनंगटीवार पुन्हा नाराज आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीनंतर मुनगंटीवार म्हणाले, “नेहमीप्रमाणे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला सुरू होईल, दोन आठवड्यांसाठीच्या कामकाजाला आज मान्यता देण्यात आली आहे. कामकाजामध्ये आवश्यक असेल तर अधिवेशन वाढवण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुधीर मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनाबाबत काय मागणी केली?

    Ans: हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांऐवजी तीन किंवा चार आठवड्यांचे घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

  • Que: सुधीर मुनगंटीवार यांनी सावरकरांबाबत काय मागणी केली?

    Ans: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव याच हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, असा आग्रह त्यांनी धरला.

  • Que: सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यामुळे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा सुरू का आहेत?

    Ans: अधिवेशनाचा कालावधी वाढवला नाही तर ‘इंग्रजांपेक्षा आपले सरकार वाईट आहे’, असा संदेश जाऊ नये, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या सरकारवरील नाराजीची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Sudhir mungantiwar upset in bjp compared mahayuti with british government maharashtra politics nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Mahayuti Government
  • Nagpur Winter session
  • Sudhir Mungantiwar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.