Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सध्याचे सरकार गतिमान नाही, केवळ देवेंद्र फडणवीस एकटेच काम करताहेत’; सुप्रिया सुळे यांचं विधान

ईव्हीएमबाबत मतदारांमध्ये संभ्रम आहे. माझी निवडणूकही या यंत्रावर झाली तरी मतदारांचा ईव्हीएमवरील विश्वास उडालेला आहे. कागल, चंदगडमध्ये आता निवडून आलेल्यापेक्षा आमच्या उमेदवार किती तरी पटीने चांगल्या, सुसंस्कृत होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 27, 2025 | 07:39 AM
'सध्याचे सरकार गतिमान नाही, केवळ देवेंद्र फडणवीस एकटेच काम करताहेत'; सुप्रिया सुळे यांचं विधान

'सध्याचे सरकार गतिमान नाही, केवळ देवेंद्र फडणवीस एकटेच काम करताहेत'; सुप्रिया सुळे यांचं विधान

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिले. मात्र, अजूनही पालकमंत्रिपदाचा घोळ संपलेला नाही. सरकार गतिमान नाही. केवळ देवेंद्र फडणवीस एकटेच काम करत आहेत. राज्यात ‘वन मॅन शो’ कारभार सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

राज्यातील विविध मुद्यांवरून त्यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘महायुतीच्या सरकारमध्ये समन्वय नाही. सरकार येऊन 60 दिवस झाले तरी अजूनही सर्व मंत्री कामाला लागलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. केवळ निवडणुकीचा जुमला होता म्हणून वेळ मारून नेऊ नये. पीकविमा, वेमा, हार्वेस्टरच्या अनुदानातील घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेमध्ये विचारणार आहे. याचे पुरावे गोळा करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

चंदगडचे आमदार कोणती हवा खाऊन आले?

खासदार सुळे म्हणाल्या, ईव्हीएम यंत्रासंबंधी मतदारांमध्ये संभ्रम आहे. माझी निवडणूकही या यंत्रावर झाली तरी मतदारांचा ईव्हीएमवरील विश्वास उडालेला आहे. कागल, चंदगडमध्ये आता निवडून आलेल्यापेक्षा आमच्या उमेदवार किती तरी पटीने चांगल्या, सुसंस्कृत होत्या. काही तरी करून दाखवण्याची उमेद त्यांच्यामध्ये होती. पण वेगळीच हवा खाऊन आलेले आमदार झाले, असेही त्यांनी म्हटले आहे.

भ्रष्टाचारावरही केलं भाष्य

राज्यातील कृषी खात्यात भ्रष्टाचार झाल्याची कबुली राज्याच्या कृषिमंत्र्यांनी दिल्याचे वृत्त मी स्वतः पाहिले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पैसे येत नाहीत, असे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानते, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत आपण अर्थसंकल्पात चौकशीची मागणी करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

पॉलिसीबाबत बोललं पाहिजे

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्रिपदाबाबत महायुतीमध्ये नाराजी आहे. रायगडमध्ये झालेलं आंदोलन तसेच एक ते दोन ठिकाणी मिळालेली स्थगिती याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, या सरकारला येऊन दोन महिने झाले आहे, मला उबग आलं आहे, या सगळ्या गोष्टींचं माझं एकच म्हणणं आहे की, पॉलिसीबाबत बोललं पाहिजे. या सरकारने या दोन महिन्यात कोणत्या पॉलिसी राबविल्या यावर बोललं पाहिजे. राज्यात जे काही चाललं आहे, ते मी पहिल्यांदा बघत आहे, असं कधीही कोणत्याही राज्यात तसेच देशात मी बघितलं नसल्याचं यावेळी खासदार सुळे म्हणाल्या.

Web Title: Supriya sule criticized on bjp and mahayuti government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 07:39 AM

Topics:  

  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

Kafanchori in mumbai : राज्याच्या राजकारणात आता ‘कफनचोरी’! मुख्यमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतर सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
1

Kafanchori in mumbai : राज्याच्या राजकारणात आता ‘कफनचोरी’! मुख्यमंत्र्यांच्या गंभीर आरोपानंतर सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
2

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा

Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेच्या घोटाळ्यासंदर्भात PIL दाखल करणार; खासदार सुप्रिया सुळेंची आक्रमक भूमिका
3

Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेच्या घोटाळ्यासंदर्भात PIL दाखल करणार; खासदार सुप्रिया सुळेंची आक्रमक भूमिका

माफी मागा अन्यथा…; मटणावर वक्तव्य करत सुप्रिया सुळेंनी ओढावली वारकरी सांप्रदायाची नाराजी?
4

माफी मागा अन्यथा…; मटणावर वक्तव्य करत सुप्रिया सुळेंनी ओढावली वारकरी सांप्रदायाची नाराजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.