
सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशामुळे संघटनात्मक पातळीवर मिळणार अधिक बळ
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. महानगरपालिका निवडणूक रंगू लागली आहे. अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश होत आहे. असे असताना आता प्रभावशाली नेते सुरेंद्र पठारे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांना संघटनात्मक पातळीवर अधिक बळ मिळणार असून, पूर्व पुण्यात भाजपची पकड आणखी मजबूत होईल, असे म्हटले जात आहे.
सुरेंद्र पठारे यांनी रिअल इस्टेट, तंत्रज्ञान आणि कृषी-तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत यशस्वी उद्योग उभारले आहेत. उद्योग क्षेत्रातील सक्षम नेतृत्व म्हणून पुणे शहरातील उद्योगवृद्धीस चालना देण्यासाठी त्यांनी विविध माध्यमांतून प्रयत्न केले असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला हातभार लावला आहे. राजकीय-सामाजिक नेतृत्वासोबतच सुरेंद्र पठारे हे एक कुशल उद्योजक म्हणूनही परिचित आहेत. निस्वार्थ सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कुटुंबाचा वसा पुढे नेत सुरेंद्र पठारे यांनी जनहित आणि जनसेवेची परंपरा सक्षमपणे सुरू ठेवली आहे. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या कुटुंबात वाढ झाल्यामुळे ‘समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो’ ही मूल्ये सुरेंद्र पठारे यांच्यात लहानपणापासून रुजली. त्यांचे वडील बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्रात अनेक दशकांपासून लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवेत मोलाचे योगदान दिले आहे.
हेदेखील वाचा : वडगाव मावळमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला; अंदाज–तर्क वितर्कांना उधाण, ढोल–ताशा पथकांची तयारी
पुणे शहराच्या पूर्व भागातील प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांना संघटनात्मक पातळीवर अधिक बळ मिळणार असून, पूर्व पुण्यात भाजपची पकड आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
थेट जनतेशी संबंध
सुरेंद्र पठारे हे कर्तृत्ववान, कार्यशील आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून पूर्व पुण्यात ओळखले जातात. खराडी व वडगावशेरी परिसरात समाजकार्यासाठी आणि जनसेवेसाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले असून, सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. निष्काम व निःस्वार्थ सेवाभावामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे.
सकारात्मक बदल घडवून आणला
समाजात सकारात्मक बदल घडवण्याची त्यांची तळमळ विविध उपक्रमांतून स्पष्टपणे दिसून येते. क्रीडाक्षेत्र आणि युवकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयोजित कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच सामाजिक प्रश्नांवर जनजागृती मोहिमा अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आजवर असंख्य लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सकारात्मक बदल घडवून आणला आहे.