Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सत्ता डोक्यात गेली का?’ पत्रकारांना धमकी प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा संजय दिना पाटील यांच्यावर हल्लाबोल

पत्रकारांना खुलेआम धमकी दिल्याच्या आरोपांवरून खासदार संजय दिना पाटील अडचणीत आले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर निशाणा साधत सत्ता आणि पैसा डोक्यात गेल्याची टीका केली.

  • By विवेक
Updated On: Jun 25, 2026 | 05:11 PM
पत्रकारांना धमकी प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा संजय दिना पाटील यांच्यावर हल्लाबोल

पत्रकारांना धमकी प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा संजय दिना पाटील यांच्यावर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • पत्रकारांना धमकी दिल्याच्या आरोपांवरून सुषमा अंधारे याची संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार टीका
  • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी, अशी अंधारेंची मागणी
  • राज्यात पत्रकार, महिला आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा
 

ठाकरे गटातून बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी संजय दिना पाटील यांच्यावर टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “जोपर्यंत हे नेते आमच्यासोबत होते तोपर्यंत शिस्तीत होते. मात्र पक्षांतरानंतर अवघ्या तीन दिवसांत सत्ता आणि पैशाचा प्रभाव त्यांच्या वागणुकीत दिसून येत आहे. माणूस किती बदलू शकतो, याचे उदाहरण संजय दिना पाटील यांच्या रूपाने समोर आले आहे,” अशी टीका त्यांनी केली.

गृहमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी

संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी देताना “कोणत्या कमिश्नरकडे जायचं ते जा” असे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत अंधारे यांनी गृहखात्यावरही प्रश्न उपस्थित केले. पोलिस आयुक्त आणि अधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र दिसत असून यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘पुन्हा आलात तर मारून पाठवेन…’, खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकाराला धमकी; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून जाहीर माफी

“राज्यात कुणीच सुरक्षित नाही”

राज्यात महिलांवरील अत्याचार, लोकलमधील गुन्हे, लोकप्रतिनिधींवरील हल्ले आणि अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या यांचा उल्लेख करत अंधारे म्हणाल्या की, आता पत्रकारांनाही धमक्या दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत गृहखाते नेमके कोणाच्या सुरक्षेसाठी काम करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “या राज्यात मुली सुरक्षित नाहित. महिला सुरक्षित नाहीत. लोकलमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. लोकप्रतिनिधींना विधीमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते. म्हणजेच लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचेही काही खरे नाही. अधिकाऱ्यांना खुल्या धमक्या दिल्या जात आहेत. आता पत्रकारांनाही धमक्या दिल्या जात आहेत.”

सुषमा अंधारे यांनी संजय दिना पाटील यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवरही टीका केली. “राज्याचं गृहखाते कोणाला सुरक्षा देण्यासाठी काम करत आहे. संजय दिना यांच्यासारखे उन्मत्त, गुंडगिरी करणाऱ्या लोकांना वाय प्लस सुरक्षा दिलेली आहे. या लोकांनी दिवसा पत्रकारांचे खून पाडावेत, यासाठी दीना पाटील यांना सुरक्षा दिली आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

‘अरे काही बोलू दे.. तुझ्या XXX…’, संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Web Title: Sushma andhare slams sanjay dina patil over threat to journalists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Sanjay Dina Patil
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.