Swami Avimukteshwaranand Saraswati statement on Thackeray family not belong to Maharashtra
Avimukteswarananda Saraswati on Thackeray : मुंबई : राज्यामध्ये सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरु झाला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. महाराष्ट्र सरकारकडून प्राथमिक शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पर्यायी भाषा म्हणून हिंदी देण्यात आली. मात्र या मुद्द्यावरुन मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. मात्र हा विरोध करणाऱेच ठाकरे महाराष्ट्रामधील नसल्याचा दावा स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे नेहमी त्यांच्या वक्तव्यावरुन चर्चेमध्ये असतात. आता त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्यामध्ये सुरु असलेल्या मराठी आग्रहावर देखील स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मराठीला कानशिलात लगावणारी भाषा केल्याने यश मिळणार आहे का? हिंदी ही राजभाषा आहे. त्याचा काही प्रोटोकॉल बनत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. मुंबईतील काही व्यावसायिकांनी मराठी बोलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्या प्रकरणी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रतिक्रिया दिली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली अनेक वर्षे राज्य करणाऱ्या ठाकरे परिवाराबाबत मोठा दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाची आता चौथी पिढी राजकारणामध्ये असून महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांसाठी आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी ठाकरे कुटुंबाने आवाज उठवला आहे. मात्र हे ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातील नसल्याचा दावा स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला आहे. ते म्हणाले की, ठाकरे हेही महाराष्ट्राच्या बाहेरुन आले आहेत. महाराष्ट्राने ठाकरेंना स्वीकारले आहे. आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत, असा खळबळजनक दावा स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “राज ठाकरेंबाबत बोलू झालं तर देशातील कायदा व्यवस्था समाप्त झाली आहे. कुणी सार्वजनिक ठिकाणी उभे राहून मारहाण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत असेल तर कॉन्स्परन्सी आहे की, लॉ अँड ऑर्डर थोक्यात असल्याचे मत स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठी भाषेच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधू हे दोन दशकांनंतर एकत्र आले आहेत. राज्यामध्ये हिंदी भाषा लादण्यावरुन आणि मराठी अस्मिता राखण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले. ठाकरे बंधू हे या निमित्ताने एकाच मंचावर आलेले दिसून आले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठा उत्साह देखील दिसून आला. कोणत्याही झेंडा आणि कोणत्याही अजेंडाशिवाय हे दोन्ही नेते एकत्रित आले. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही भावांचे एकत्रित येण्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे.