Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाच्या नेत्यांचा महायुतीत पक्षप्रवेश ?; ‘शत प्रतिशत भाजपा’ चे स्वप्न अहिल्यानगरकर करणार पूर्ण?

विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मिळालेल्या यशानंतर इतर पक्षातील आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांचा महायुतीत पक्षप्रवेश होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 04, 2025 | 12:22 PM
ठाकरे गटाच्या नेत्यांचा महायुतीत पक्षप्रवेश ? ; 'शत प्रतिशत भाजपा' चे स्वप्न अहिल्यानगरकर करणार पूर्ण?

ठाकरे गटाच्या नेत्यांचा महायुतीत पक्षप्रवेश ? ; 'शत प्रतिशत भाजपा' चे स्वप्न अहिल्यानगरकर करणार पूर्ण?

Follow Us
Follow Us:

मुंबई प्रतिनिधी : राज्यात लोकसभेच्या पराभवांनंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली अनेक लोकहिताचे शासन निर्णय घेत लाडक्या बहिणी पासून लाडक्या शेतकरी वर्गा पर्यंत सर्वांना खुश करण्यात महायुती यशस्वी ठरली आणि विधानसभेत भरघोस मतांनी विजयी झालेल्या महायुतीने पुन्हा एकदा राज्यात आपले सरकार स्थापन केले. या अविश्वसनीय विजयानंतर भाजपाकडून आता आगामी सर्वच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यासह देशभरात ‘शत प्रतीशत भाजपा’ हा संकल्प केल्याचे समजते. त्यानुसार राज्यातील आगामी निवडणुकांची तयारी देखील भाजपाने सूरु केली आहे.

विधानसभा निवडणुकीत नाराज गटाला आपल्याकडे वळविण्यासाठी आता तयारी सुरु केल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील आता भाजपाकडून शत प्रतीशत भाजपा राबविणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. तर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीत मोठी फूट पहायला मिळाली. जिल्ह्यातील हाच नाराज गट भाजपाच्या गळाला लागल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ठाकरे सेनेतील काही नेते, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते हे शिंदेंच्या तंबूत जात असतानाच आता या सर्वांना भाजपाने आपल्याकडे खेचल्याचे समजते.

अहिल्यानगर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते हे पक्षाचा भूमिकेवर प्रचंड नाराज झाले असून विधानसभा निवडणुकीनंतर देखील पक्षातील वरिष्ठांकडून देखील कुठलीही दखल न घेतल्याने हा सर्व नाराज गट लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. काल गुरुवारी ठाकरे गटातील काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेगटात पक्षप्रवेश केला. यानंतर लवकरच उर्वरित नेते आणि पदाधिकारी देखील शिंदेगटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते आणि पदाधिकारी हे भाजपाच्या धोरणांना आत्मसात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नक्की भाजपात जातील की शिंदेंच्या शिवसेनेत हे येणारा काळच ठरवेल.

देशात, राज्यासह स्थानिक पातळीवर देखील भाजपच हवी!, नागरिकांच्या मानसिकतेत बदल

दरम्यान नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार तर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्याची धुरा भाजपचे देवेंद्र फडणवीस हे लिलया सांभाळत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील ‘शत प्रतीशत भाजपा’ हा संकल्प घेवून वाटचालीस सुरुवात केली आहे. तर सामान्य नागरिक देखील भाजपाकडे चांगलाच आकर्षिला असल्याने अहिल्यानगर शहरातील हे नेते व पदाधिकारी भाजपाचा देखील पर्याय म्हणून चाचपणी करीत आहे.
त्यातच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या पदांवर जिल्ह्यातील दोन्ही भाजपचेच मान्यवर आल्याने याचा फायदा शहर विकासासाठी होऊ शकतो.

ठाकरे सेनेंची गुप्त बैठक, बैठकीत भाजपाच्या देखील पर्यायाची चाचपणी

दरम्यान काही दिवसांपासून शहरातील शिवसैनिक ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. परंतु काल रात्री उशिरापर्यंत शहरातील एका अज्ञात ठिकाणी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपाचा देखील पर्याय सर्वांसमोर ठेवण्यात आला. या सर्वांच्या प्रवेशासाठी भाजपातील वरिष्ठ पातळीवरील नेताच प्रयत्नशील असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. काल अचानक शिंदे सेनेंसोबत भाजपाचा देखील पर्याय आल्याने लवकरच भाजपा की शिंदे यांची शिवसेना हे ठरणार आहे.

 

Web Title: Thackeray group leaders join grand alliance will ahilyanagarkar fulfill the dream of 100 percent bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • BJP Devendra Fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Sangali News: वामन-बळीराजाचं चित्र हटवा; फडणवीस, गडकरींना मागणी
1

Sangali News: वामन-बळीराजाचं चित्र हटवा; फडणवीस, गडकरींना मागणी

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका
2

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ
3

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
4

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.