Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reservation of Mayoral Posts: २९ महानगरपालिकांच्या महापौर निवडीचे काऊंटडाऊन सुरू; लवकरच आरक्षण सोडत जाहीर होणार

Municipal Election Update: महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर आरक्षणाकडे लागले आहे. ही प्रक्रिया लोकशाहीतील सर्वसमावेशकतेसाठी अत्यंत महत्त्वाची असते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 17, 2026 | 02:18 PM
Municipal Elections Results 2026, Municipal Elections Result Live Updates

Municipal Elections Results 2026, Municipal Elections Result Live Updates

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकांच्या निकालानंतर आता महापौर कोण होणार याकडे  लक्ष
  • मुंबई महापालिकेसह २५ महापालिकांवर महायुतीची सत्ता
  • २९ महापालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक १४२५ नगरसेवक निवडून आले
Reservation of Mayoral Posts: मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महानगर पालिकांचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता महापौर कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नगरविकास खात्याकडून पुढच्या आढवड्यात महापौर पदासाठी आरक्षण सोडत कधी काढली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महापौर पदाची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Municipal Elections Results 2026)

महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर आरक्षणाकडे लागले आहे. ही प्रक्रिया लोकशाहीतील सर्वसमावेशकतेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. या प्रक्रियेबाबतची अधिक माहिती आणि पुढील टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

Akola Municipal Corporation Election 2026 : अबब ! २४ हजारावर ‘नोटा’ला मतदान…, अकोल्यात कोण होणार नगरसेवक?

आरक्षण सोडतीची पद्धत

महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण हे चक्रानुसार (Rotation Policy) ठरवले जाते. यामध्ये राज्य सरकारकडून सोडत (Lottery) काढली जाते. याचे मुख्य नियम खालीलप्रमाणे असतात:

सर्वसमावेशकता: अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), नागरिक मागास प्रवर्ग (OBC) आणि महिला (सर्व प्रवर्ग) यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आणि नियमानुसार प्रतिनिधित्व दिले जाते.

बदलाचा नियम: जर मागील वेळी एखादे पद ‘सर्वसाधारण’ प्रवर्गासाठी असेल, तर या वेळी ते इतर राखीव प्रवर्गासाठी जाण्याची शक्यता जास्त असते, जेणेकरून सत्तेचे समान वाटप होईल.

महिला आरक्षण: एकूण जागांपैकी ५०% पदे महिलांसाठी आरक्षित असतात, त्यामुळे २९ पैकी निम्म्या महापालिकांमध्ये महिला महापौर पाहायला मिळतील.

मुंबई महापालिकेत कुणाचे किती उमेदवार निवडून आले?

राज्यातील नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेसह २५ महापालिकांवर महायुतीची सत्ता आली. मुंबई महापालिकेतील २२७ जागांसाठ झालेल्या या निवडणुकीत महायुतीचे एकूण ११८ सदस्य निवडून आले. यात भाजपला ८९ जागांवर विजय मिळवला, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६५ नगरसेवक निवडून आले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला २९ जागा मिळाल्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेदेखील ६ नगरसेवक निवडून आले, तर शरद पवार गटाला १ जागा आणि अजित पवार गटाला ३ जागा तर इतर पक्षांचे २ नगरसेवक निवडून आले. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेत ८ जागांवर एमआयएमचे नगरसेवक निवडून आले. पण मुंबई भाजपच्या सर्वाधिक जागा मिळवल्यामुळे याठिकाणी भाजपचाच महापौर बसणार असल्याचे निश्चत झाले आहे. (BMC Election 2026)

BMC Election Result 2026: फूट आणि फटका, तरीही ठाकरेंचा झुंजार लढा; मुंबईतील ६५ जागांचा खरा अर्थ काय?

२९ महापालिकांची सद्यस्थिती

राज्यातील सर्व २९ महापालिकांचे निकाल लागलेले असल्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी ‘आरक्षण’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत कोणत्या गटातील नगरसेवक महापौर बनणार हे स्पष्ट होत नाही. यामुळे अनेक इच्छुकांनी सध्या आपापल्या पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पुढील प्रक्रिया आणि निकाल

आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुढील टप्पे खालीलप्रमाणे असतील:

विभागीय आयुक्तांकडून सूचना: आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर संबंधित विभागीय आयुक्त महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करतात.

अर्ज भरण्याची प्रक्रिया: पात्र प्रवर्गातील नगरसेवक महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरतात.

निवडणूक: जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील, तर महापालिकेच्या सभागृहात प्रत्यक्ष मतदान होऊन महापौरांची निवड केली जाते.

राज्यभरात निवडून आलेले नगरसेवक

राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक १४२५ नगरसेवक निवडून आले, त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे गटाचे ३९९ उमेदवार निवडून आले. त्यानंतर काँग्रेसचे ३२४ नगरसेवक निवडून आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे १६७, शिवसेना ठाकरे गटाचे १५५, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ३६, तर मनसेचे १३ उमेदवार विजयी झाले. बहुजन समाजवादी पार्टीचे ६ आणि एमआयएमचे १२५ उमेदवारांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवला. या पद्धतीने राज्यात भाजपचे सर्वाधिक नगरसवेक निवडून आलयाने भाजपने राज्यभरात एकच जल्लोष केला.

 

 

 

Web Title: The countdown has begun for the mayoral elections in 29 municipal corporations the reservation draw will be announced soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 02:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.