अबब ! २४ हजारावर 'नोटा'ला मतदान, ..., अकोल्यात कोण होणार नगरसेवक?
एवढ्या संख्येने मतदारांनी पसंती दर्शविल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे बहुतांश प्रभागात प्रमुख पक्षासह अपक्षांवरही ‘नोटा’च भारी पडल्याचे दिसून आले. प्रभाग क्र. ११ क मध्ये सर्वाधिक १४८७ मतदारांनी नोटाला पसंती दर्शवत मतदान केले, तर १३ ड मध्ये सर्वात कमी १०३ मतदारांनी नोटाला मतदान केले. गेल्या काही निवडणुकीत कोणताच उमेदवार पसंतीस पात्र नाही, हे दर्शविण्यासाठी नोटाला मतदार हे मतदान करीत असल्याचे दिसून आले. मात्र यावर्षी प्रथमच महानगर पालिकेच्या इतिहासात सर्वात जास्त मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. एकूण ८० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ८० जागी एकूण २४ हजार ५४ मतदान हे नोटाला झाले. मोजक्या प्रभागात अपक्ष उमेदवाररांपेक्षा नोटाला कमी मतदान झाले. मात्र सरासरी ९० टक्के जागांवर अपक्ष आणि इतर पक्षाच्या उमेदवारापेक्षा नोटालाच अधिक मतदान झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
एकूण विचार करता ८० जागांसाठी झालेल्या नोटाच्या मतदानात सरासरी ३०० मतदारांनी प्रत्येक जागेसाठी नोटाला पसंती दर्शविली. तर सरकारी विश्लेषकांच्या मते, नोटाला मिळालेली पसंती सध्याच्या सरकारी परिस्थितीबद्दलची असंतोष, स्थानिक पातळीवर काम झाले नसल्याची भावना आणि उमेदवारांवरील असंतोष दर्शवते. विशेषतः महापालिका निवडणुकीत स्थानिक समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक यासारख्या मुद्द्यांवर ठोस भूमिका अपेक्षित असते. ती अपेक्षा पूर्ण न झाल्याने मतदारांनी हा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. या निकालामुळे सर्वच राजकीय पक्षांसमोर आत्मपरीक्षणाची वेळ आलीये. आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार निवड, जनसंपर्क आणि प्रत्यक्ष कामावर भर देणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश वॉर्ड क्रमांक 119 मधील मतदारांनी दिला आहे.






