Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; पुणे-कोल्हापूर-हुबळी प्रवास होणार सोयीस्कर

मोदी सरकारकडून वंदे भारत एक्सप्रेस ही अद्यावत तंत्रज्ञानासह भारतीय रेल्वेमध्ये आणण्यात आली आहे. यामध्ये आता पुण्यामध्ये देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. याची माहिती खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन होणार आहे

  • By प्रीति माने
Updated On: Sep 14, 2024 | 06:38 PM
Pune's first 'Vande Bharat express

Pune's first 'Vande Bharat express

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याला मिळालेल्या पहिल्या वंदे-भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण सोमवारी (दि.16) होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने हे उद्घाटन होणार आहे. यावेळी पुणे-हुबळी या वंदे-भारत एक्स्प्रेसला केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे स्थानकावरुन झेंडा दाखवणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकरांना प्रतिक्षित असणारी तसेच पुण्याहून सुटणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारकडून महाराष्ट्राला ३ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. यामध्ये पुणे-हुबळी, नागपूर-सिकंदराबाद आणि कोल्हापूर-पुणे आदी मार्गाचा समावेश आहे. या तिन्ही वंदे भारतचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुण्याला पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मिळाली, ही पुणेकर प्रवाशांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. केवळ पुणेच नाही तर या एक्स्प्रेसचा फायदा पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण पटट्यासाठी होणार आहे. पुणे, सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूर या भागात दळणवळण भक्कम होण्यास हातभार लागणार आहे. शिवाय यामुळे अर्थकारणालाही गती मिळणार आहे” अशा भावना मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

पुढे ते म्हणाले, “मोदी सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्रात आताच्या घडीला रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत ८१ हजार ५८० कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत. शिवाय यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून रेल्वेसाठी महाराष्ट्राला १५ हजार ९४० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यात १३२ रेल्वे स्थानक जागतिक दर्जांची करण्यात येत असून एकूण ८ वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात धावत आहेत,” असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.

Web Title: The launch of pune first vande bharat on monday will make pune kolhapur hubli travel convenient

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 06:38 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • pune news update
  • vande bharat
  • vande bharat express

संबंधित बातम्या

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?
1

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
2

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया
3

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला
4

मुलांना तंत्रज्ञानाचे ‘गुलाम’ बनू न देता, त्याचा ‘मालक’ बनायला शिकवा; शिक्षक अमोल हंकारे यांचा मोलाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.