
निवडणुकीची मतमोजणी आज होणार; राज्यातील जनतेचे लक्ष
मुंबई : राज्यात नगरपरिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान नुकतेच पार पडले. त्यानंतर आता या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल आज जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ ला मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर २१ डिसेंबर ही निकालाची तारीख ठरवण्यात आली. राज्यात झालेल्या २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकींचा आज निकाल विजयाचा गुलाल पडणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज मतमोजणीत मिळणार आहे.
भाजपाला राज्यात सर्वाधिक १४० ते १५२ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये विजय मिळेल, असे भाकीत वर्तवले आहे. त्या खालोखाल शिंदे यांच्या शिवसेनेला ३४ ते ४२ नगरपरिषदांमध्ये तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २४ ते ३६ नगरपरिषदांमध्ये यश मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसला २५ ते ३५ नगरपरिषदांमध्ये सत्ता मिळेल, अंदाज बांधण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसल्याचे एक्झिट पोलमधून सांगण्यात येत आहे.
हेदेखील वाचा : Mangalwedha Voting: मंगळवेढा नगरपरिषदेसाठी 69.77 टक्के मतदान, किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली प्रक्रिया
2 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. शनिवारी 23 ठिकाणी मतदान पार पडले. त्यानंतर आज सकाळी 10 वाजता या सर्व निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता उद्या कोणता पक्ष बाजी याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
मंगळवेढ्यात महिलांचे सर्वाधिक मतदान
मंगळवेढा नगरपरिषदेसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या मतदानामध्ये 69.77 टक्के इतके मतदान झाले असून सर्वाधिक मतदान महिलांचे 14 हजार 385 म्हणजेच पुरुषापेक्षा 134 महिला मतदारांनी अधिक मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
हेदेखील वाचा : संगमनेरात आज तीन जागांसाठी मतदान! कोण होणार नगराध्यक्ष? प्रत्येक उमेदवाराला विजयाची आस