Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : परभणीमध्ये राजकीय हालचालींना वेग! महापौरपदासाठी १४ अर्ज दाखल तर उप-महापौरपदासाठी ७ अर्ज

महापौर व उपमहापौर पदासाठी ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आले. या मुदत्तीत २२ उमेदवारांना ५० नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 05, 2026 | 05:59 PM
Nomination forms distributed for the posts of Mayor and Deputy Mayor Parbhani News

Nomination forms distributed for the posts of Mayor and Deputy Mayor Parbhani News

Follow Us
Follow Us:

Political News : परभणी : परभणी शहर आणि महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या मुदतीत महापौरपदासाठी २४ तर उपमहापौर पदासाठी ७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. येथील बी. रघुनाथ सभागृहात १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महापौर व उपमहापौर पदासाठी ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आले. या मुदत्तीत २२ उमेदवारांना ५० नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले. तर मंगळवारी (दि. ३) सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा या वेळेत महापौर पदासाठी विविध पक्षांच्या उमेदवाराकडून १४ आणि उपमहापौर पदासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांकडून ७ नामनिर्देशनपत्र महापालिकेचे नगरसचिव विकास रत्नपारखे यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत, आता महापौर आणि उपमहापौर निवडीच्या विशेष बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : ”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली

निवडीची ही विशेष बैठक १२ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी व पिठासीन अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. याच विशेष बैठकीत प्राप्त उपमहापौर व महापौर पदाच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. छाननीअंती पात्र उमेदवारांची नावे पिठासीन अधिकारी जाहीर करतील. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांना १५ मिनिटे आगाऊ लेखी सूचना देऊन उमेदवाराना नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत. बैठकीत अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषित करण्यात येतील, या विशेष बैठकीत हात उंचावून मतांची नोंद घेतली जाणार आहे.

महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गास आरक्षित

महानगरपालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. परभणी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. तर काँग्रेस -१२, भारतीय जनता पक्ष १२, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ११, स्थानिक आघाडी जनसुराज्यशक्ती ३, यशवंत सेना -१ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणूकपूर्व आघाडी केली होती. निवडणूक निकालात या आघाडीच्या आघाडीच्या एकूण ३७जागा निवडून आल्या आहेत. ६५ सदस्यीय सभागृहात ३३ हा बहुमताचा जादुई आकडा आहे.

हे देखील वाचा : नांदेडमध्ये कला महोत्सव ठरला फ्लॉप! रिकाम्या खुर्च्यांसमोर लोककलेचा अपमान

उपहापौरपदाचे उमेदवार

नाझिमा बेगम, प्रभाग ६, राष्ट्रवादी काँग्रेस, विश्वजीत बुधवंत, प्रभाग ४ क, भाजप, श्याम खोने, प्रभाग १६ शिवसेना उबाठा, तिरुमला खिल्लारे, प्रभाग १व, भाजप, भगवान वाघमारे, प्रभाग ९अ, कसीस, गणेश देशमुख, प्रभाग १ ड, काँग्रेस, गुलमीर खान, प्रभाग ७क, काँग्रेस.

महापौरपदाचे उमेदवार

सय्यद समी उर्फ माजुलाला, प्रभाग ८ ड शिवसेना उबाठा, सय्यद इकबाल सय्यद खाजा, प्रभाग ८क, शिवसेना उबाता श्याम खोबे, प्रभाग १६ क. शिवसेना उबाठा, शरफुद्दीन सिद्दिकी, प्रभाग ३अ, शिवसेना उबाठा, दिलीपसिंह ठाकुर, प्रभाग ९ड, शिवसेना उभाठा, डॉ. केदार खटींग, प्रभाग १५ इ. भाजप, प्रतिभा सरोदे, प्रभाग ४ अ. शिवसेना उबाटा, मीना वरपूडकर प्रभाग ५ क, भाजए, अर्जुन सामाले प्रभाग १० क. राष्ट्रवादी काँग्रेस, तिरुमला खिल्लारे, प्रभाग १ ३, भाजप, रितेश झांबड जैन, प्रभाग ५ड, भाजए, भगवान वाघमारे, प्रभाग ९ अ. काँग्रेस, गणेश देशमुख, प्रभाग १ ड, काँग्रेस, गुलमीर खान, प्रभाग ७ क, काँग्रेस.

Web Title: Nomination forms distributed for the posts of mayor and deputy mayor parbhani news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • nanded news
  • Parbhani News
  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
3

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.