Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? वकिलाचे थेट राज्यपालांनाच पत्र

वर्ध्याच्या एका वकिलाने हा शपथविधीच घटनाबाह्य ठरवला आहे. इतकेच नाहीतर त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहून या वकिलाने सुनेत्रा पवारांना पुन्हा नव्याने पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याची मागणी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 05, 2026 | 09:11 AM
मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? वकिलाचे थेट राज्यपालांनाच पत्र

मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? वकिलाचे थेट राज्यपालांनाच पत्र

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या त्या उपमुख्यमंत्री आहेत. असे असताना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वर्ध्याच्या एका वकिलाने हा शपथविधीच घटनाबाह्य ठरवला आहे. इतकेच नाहीतर त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहून या वकिलाने सुनेत्रा पवारांना पुन्हा नव्याने पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याची मागणी केली आहे.

वर्ध्याचे वकील हर्षवर्धन गोडघाटे यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी हा शपथविधी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. मंत्र्यांशी संबंधित तरतुदींशी निगडित असलेल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६४ नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल करत असतात. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतील. तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या स्वरूपानुसार, कोणताही मंत्री पदभार स्वीकारण्यापूर्वी राज्यपाल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, अशी तरतूद आहे. संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये मंत्र्यांच्या पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा नमूना दिलेला आहे.

दरम्यान, शपथविधी समारंभादरम्यान सुनेत्रा पवार यांनी दोनदा सांगितले की, त्या उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत, जे असंवैधानिक आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. भारतीय संविधानात कुठेही उपमुख्यमंत्री या पदाची तरतूद नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ आपोआपच बेकायदेशीर ठरते.

मंत्र्यांसाठीच्या तरतुदीनुसार शपथ घेणे घटनासंमत

सुनेत्रा पवार यांनी भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या स्वरूपानुसार, म्हणजेच मंत्र्यांसाठी असलेल्या शपथेनुसार शपथ घ्यायला हवी होती. त्यामुळे ही शपथ घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खात्यासाठी जबाबदार राहिले पाहिजे. अन्यथा, महाराष्ट्रासारख्या राज्यात भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच उघडपणे संविधानाचे उल्लंघन करत आहेत, असा संदेश जाईल.

राजभवनात जाऊन घेतली शपथ

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्या जाण्यानंतर उपमुख्यमंत्रिपद रिक्त झाले. या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुंबईत राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून सुनेत्रा पवारांची पक्षाच्या बैठकीत पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

हेदेखील वाचा : Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष

Web Title: Sunetra pawar oath taking ceremony is unconstitutional lawyer harshvardhan godghate letter to the governor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • political news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
1

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान
3

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर
4

Maharashtra MLC Election 2026: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.