Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी महामंडळाच्या निवडणुकीत येणार रंगत; 17 जागांसाठी 43 उमेदवार मैदानात

२०१० नंतर होणाऱ्या निवडणुकीत विक्रमी अर्ज प्राप्त झाले. नऊ गटांसह दोन महिला राखीव अशा १७ जागांसाठीच्या निवडणुकीत ६४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले. नाशिक गटातून ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 02, 2025 | 03:54 PM
आदिवासी महामंडळाच्या निवडणुकीत येणार रंगत; 17 जागांसाठी 43 उमेदवार मैदानात

आदिवासी महामंडळाच्या निवडणुकीत येणार रंगत; 17 जागांसाठी 43 उमेदवार मैदानात

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी झाल्यानंतर बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रयत्नास प्रतिसाद मिळाला नाही. तर शुक्रवारी अंतिम दिवशी २१ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १७ जागांसाठी आता ४३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत ३ नोव्हेंबरला चिन्ह वाटप होईल, १४ नोव्हेंबरला मतदान होणार असून, १६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

नाशिकमधून मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर, माजी आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित, माजी आमदार शिवराम झोले रिंगणात आहेत. २०१० नंतर होणाऱ्या निवडणुकीत विक्रमी अर्ज प्राप्त झाले. नऊ गटांसह दोन महिला राखीव अशा १७ जागांसाठीच्या निवडणुकीत ६४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले. नाशिक गटातून ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

सर्वाधिक १० अर्ज महिला गटातून प्राप्त झाले. १७ ऑक्टोबरला अर्ज छाननीनंतर १७ जागांसाठी ६४ उमेदवारांचे ९९ अर्ज शिल्लक होते. शुक्रवारी माघारीचा अंतिम दिवस होता. यात २१ उमेदवारांनी माघार घेतली. यात माजी आमदार निर्मला गावित, जे. पी. गावित, विनायक माळेकर, कमळ माळेकर, भरत गावित यांचा समावेश आहे.

चंद्रपुरात ४ तर गडचिरोलीत ६ उमेदवार मैदानात

पुणे, रायगड, अहिल्यानगर गटातून ८ अर्ज दाखल होते. माजी आमदार वैभव पिचड यांनी समजूत काढत माघारीची फिल्डिंग लावली. त्यामुळे पिचड यांचा एकमेव अर्ज राहिला. अमरावती मतदारसंघातून आमदार केवळराम काळे यांची बिनविरोध निवड झाली. विदर्भात अमरावती, (यवतमाळ- नांदेड), (नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया), चंद्रपूर, गडचिरोली हे मतदारसंघ आहेत. चंद्रपुरात ४ तर गडचिरोलीत ६ उमेदवार मैदानात राहिले आहे.

Web Title: Tribal corporation elections will held soon 43 candidates in the fray for 17 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन; भाजपाकडून एकता पदयात्रेचं आयोजन 
1

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन; भाजपाकडून एकता पदयात्रेचं आयोजन 

MNS MVA Satyacha Morcha: “मग तुम्हाला अडवले…”; Vote Chori च्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा घणाघात
2

MNS MVA Satyacha Morcha: “मग तुम्हाला अडवले…”; Vote Chori च्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा घणाघात

Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान
3

Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान

Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन
4

Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.