
Uddhav Thackeray criticizes Shahaji Bapu Patil Election Commission officials action against
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. त्यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयातील उपस्थितांना बाहेर जाण्यास मज्जाव केला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे. मागील काही दिवसांपासून शहाजी बापू पाटील हे भाजप विरोधी भूमिका घेत होते.
हे देखील वाचा : ‘निवडणूक आयोगाला सोट्याने हाणायला हवे’; काँग्रेसच्या ‘या’ पदाधिकाऱ्याचे खळबळजनक विधान
शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी भाजपने पैसे वाटप केल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. तसेच सांगोल्यामध्ये त्यांना डावल्याचा आरोप देखील केला होता. यानंतर महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. यावरुन विरोधकांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्यातला एक गद्दार गेला त्याचा डायलॉग फेमस झाला होता काय झाडी काय डोंगर वगैरे.. आता त्याला जाऊन विचारा कारण त्याच्यावर ईडीची धाड पडली आहे. आता म्हण काय धाडी, काय पोलीस आणि जा आता तुरुंगात. या लोकांना मुंबईची वाट लावत आहेतच. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी १७०० हून जास्त झाडं कापायचा निर्णय घेतला आहे. मला नाशिकच्या लोकांनी फोन केला की आता काय करायचं? मी त्यांना म्हटले तपोवनातली झार्ड भाजपात गेली अशी बातमी द्या, म्हणजे झाडांची कत्तल थांबेल. झाडं भाजपात जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांची कत्तल चालवली आहे. हिंदुत्वाचे नाव घ्यायचं आणि कंत्राटदारांचं काम करायचं. यालाच म्हणतात रामाचे नाव घ्यायचं आणि या गोष्टी करायच्या, याला म्हणतात मुँह में राम नाम और बगल में अदाणी अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
हे देखील वाचा : “भावकीतील वाद जवळून पाहिलाय..; राणे बंधूंच्या कडाक्याच्या वादात रोहित पवारांची उडी