Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंची पुन्हा मागणी? हरयाणातील निकालाचे महाराष्ट्रावर पडसाद?

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्मुला अद्याप समोर आला नसून तो ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने मुख्यमंत्रिपदावरुन चेहरा जाहीर करण्याची मागणी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 09, 2024 | 08:57 AM
uddhav thackeray demand for cm of maharashtra post

uddhav thackeray demand for cm of maharashtra post

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटप आणि बोलणी सुरु आहे. मात्र काही जागांवर आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोंगडं भिजत आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे यांना निवडणूकीपूर्वी हा चेहरा समोर आलेला हवा आहे. तर निवडणूकीनंतर याचा विचार करावा असा शरद पवार यांचा सल्ला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे.

दोन वर्षांपूर्वी तयार झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. मात्र बंडाच्या राजकारणामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सरकार योग्यरितीने कार्यरित झाल्यामुळे मुख्यमंत्रिपदाची मागणी ठाकरे गटाकडून होत आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांच्या देखील महत्त्वकांशा वाढल्या आहेत. कॉंग्रेसकडून देखील मुख्यमंत्रिपदाची मागणी होत आहे. यापूर्वी यावरुन जोरदार राजकारण रंगलेले असताना शरद पवार यांनी निवडणूकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल असा थेट निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं आहे.

हे देखील वाचा : भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला…; काश्मीरच्या पराभवानंतर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं चेहरा जाहीर करावा, माझा पाठींबा असेल असा असे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे म्हणाले आहे. तसेच आपलं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नसून पुन्हा येईन असं नाही, म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जात आहे. हरयाणा विधानसभेमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाल्यामुळे ठाकरे गटाकडून दबावतंत्र वापरले जात असल्याची देखील चर्चा आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत हायकमांड निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे.

Web Title: Uddhav thackeray demand for the post of chief minister of maharashtra vidhansabha elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 08:57 AM

Topics:  

  • Uddhav Thackeray
  • Vidhansabha Election 2024

संबंधित बातम्या

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
1

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
2

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
3

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
4

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.