Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Uddhav Thackeray Press Conference: गेल्या वर्षी राज्यसरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीसाठी हेक्टरी सुमारे ३ लाख ४७ हजार रुपयांपर्यंत मदतीची तरतूद करण्यात आली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 24, 2026 | 02:46 PM
Uddhav Thackeray Press Conference, Maharashtra Drought News,

Uddhav Thackeray Press Conference, Maharashtra Drought News,

Follow Us
Follow Us:
  • राज्यात पुरेशा पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती
  • विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची बिकट परिस्थिती
  • सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला
 

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाची अधिसूचना काढणार असल्याचे जाहीर केलं असलं तरी पंचनाम्याची प्रक्रिया कधी सुरू होणार, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज्यात पुरेशा पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. Uddhav Thackeray Slams Maharashtra Govt Drought Declaration Crop Damage Panchnama Delays

विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची बिकट परिस्थिती आहे. अनेक तालु्क्यांना मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठवाड्यातील लातूर, धाराशिवसह सोलापूरमधील काही गावांचा दौरा कोला. आजही ते पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री दौऱ्यावर असतानाच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

High Court on DJ-Loudspeaker: सण-उत्सवांत डीजे- लाऊडस्पीकर वाजवायचाय? आधी ‘ही’ बातमी वाचाच, नाहीतर…

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्षी राज्यसरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीसाठी हेक्टरी सुमारे ३ लाख ४७ हजार रुपयांपर्यंत मदतीची तरतूद करण्यात आली होती.

पण या पॅकेजमधील प्रत्यक्ष मदत किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, याची माहिती राज्यातील जनतेला मिळायला हवी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. हवामान विभाग तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांनी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची शक्यता व्यक्त केली होती. दुष्काळाच्या परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन सरकारने दुष्काळ निवारणासाठी आधीपासून कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागत आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, धरणे आणि विहिरींमधील पाणीसाठ्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. आगामी रब्बी हंगामासाठी तरी पुरेसा पाऊस व्हावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

‘कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला?’

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारकडे माहिती मागितली. आमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. आता सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, याची माहिती आणि लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘गेल्यावर्षी जाहीर केलेल्या पॅकेजचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला आणि आता जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत किती शेतकऱ्यांना लाभ झाला, याची यादी आम्हाला पाहिजे,’ अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, यंदाच्या कमी पावसामुळे पीकं करपून गेली, खरीपाचा हंगाम तर शेतकऱ्यांच्या हातून निसटून गेला. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्ज आहे. मी स्वत: अनेकदा शेतकऱ्यांच्या बांधांवर गेलो आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत की ५ ऑक्टोबर नंतर पंचनामे मसुरू होती. पण वाट कशाची बघताय, इकडे शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आले आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, डोक्यावर कर्जाचं ओझं आहे.मुलांची शिक्षण, लग्नाचा प्रश्न निर्माण झालाय, सगळंच वाटोळं झालयं, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Uddhav thackeray press conference drought situation panchnama question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
1

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
2

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
3

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
4

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.