Uddhav Thackeray- Rahul Gandhi Meeting: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हेदेखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी (7 ऑगस्ट) झालेल्या बैठकीत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. या चर्चेत महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राजकीय समीकरणावर चर्चा झाली. त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबतच्या आघाडीवरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील इतर दोन प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, सुप्रिया सुळे, शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यातही स्वतंत्र बैठक झाली. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची साथ सोडणार का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
अखेर वादावर पडदा, माधुरी कोल्हापूरात परत येणार! राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे मानले आभार
दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ साठी खास मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना सामना कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी, “ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं भवितव्य काय?” असा प्रश्न विचारला होता. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”शिवसेना आणि मनसे एकत्र आल्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भविष्यात एकत्र राजकीय निर्णय घेऊ लागले, तर महाविकास आघाडीच्या गणितात काय बदल होतील? मुंबई आणि ठाणे हे स्वतंत्र विषय आहेत. तर या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”मी मुंबईला कधीच महाराष्ट्रापासून वेगळं मानत नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार होऊ शकत नाही.” उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेप्रमाणे इतर पक्षांचीही यंत्रणा आहे. त्यांना जे राजकीयदृष्ट्या योग्य वाटेल, तसं ते करतील. मात्र लढायचं नक्कीच आहे,” असे सांगून ठाकरे यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.
“आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो, यामुळे काही जणांना त्रास होतोय का? त्यांची पोटदुखी त्यांनीच सांभाळावी. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू,” असे ठाम प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनाही आनंद झाला आहे. मुस्लीम बांधवही यावर आनंद व्यक्त करत आहेत. गुजराती, हिंदी भाषिक नागरिकसुद्धा ‘अच्छा किया आपने’ असे म्हणत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहतो आहे. पण कोणाला यातून पोटशूळ होत असेल, तर तो त्यांचाच प्रश्न आहे. अशा गोष्टींकडे मी दुर्लक्ष करतो,” असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.