Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Sawant on OperationTiger: टायगर अभी जिंदा है….; अरविंद सावंतांनी स्पष्टचं सांगितलं

ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.  त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात भुकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 07, 2025 | 12:50 PM
Arvind Sawant on OperationTiger: टायगर अभी जिंदा है….; अरविंद सावंतांनी स्पष्टचं सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  “सत्ताधाऱ्यांच्या पायखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते अशा बातम्या पसरवत आहेत. जाणीवपूर्वक बातम्या पसरवणे सुरू आहे. पण आमची वज्रमुठ टायगर जिंदा है.  मनंं कलुषित करण्याच्या प्रयत्न सुरू आहे. उलट शिंदे गटाचे लोक टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये जाणार होते.  आम्ही सर्वजण ठाकरे गटासोबत आहोत.  आम्ही कुठेही जाणार नाही, असं सांगत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ऑपरेशन टायगरच्या बातम्या धुडकावून लावल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी देखील ऑपरेशन टायगरला हिरवा कंदिल दिल्याचे सांगितले जात आहे. या अंतर्गत ठाकरे गटातील खासदार फोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंचे नऊपैकी सहा खासदार भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.  त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात भुकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण ठाकरे गटाच्या सर्व नऊ खासदारांनी पत्रकार परिषद घेत आम्ही कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

Ladki Bahin Yojana : एका महिन्यात तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी झाल्या योजनेतून बाद; संजय राऊतांचा घणाघात

गेल्याकाही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार फुटणार असून शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. सत्ताधाऱ्यांकडे एवढे मोठे बहुमत असतानाही, त्यांच्यातच विसंवाद आहे. तरीही रोज नवनव्या बातम्या येत आहेत. रोज नवनवे मंत्री गटांगळ्या खात आहेत. अशा बातम्या कुठेतरी डायव्हर्ट करायच्या असल्याने ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याची पुडी सोडली जात आहे. कालदेखील लोकसभेतील शिवसेना ठाकरे गटाला कार्यालय मिळाले त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी सर्वच्या सर्व  ९ खासदार होते इथेही आता सर्व खासदार उपस्थित आहेत. म्हणून आम्ही मुद्दामहून एकत्र येऊन ही पत्रकार परिषद घेत आहोत.  आमची ही वज्रमुठ आहे. टायगर अभी जिंदा है. तसे सर्वजण इथे आहेत.

आमच्यावर आरोप करणाऱ्या शिंदे गटाचे खासदारच टप्प्याटप्प्याने भाजपमध्ये जाणार होती. हे तुम्हाला माहिती आहे का. संजय राऊत साहेबांनी काही दिवसांपूर्वी सांगितल होतं. की त्यांच्याताच एक माणूस आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार  आहे, त्याचं पुढे काय झालं. ती बातमी वळवायची असले तर आमच्यावर यायचं. यापुढे आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसात मनं कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा मी निषेध करतो. एका निष्ठेने ही माणसं राहिली आहेत. ठाकरे गटाचे हे सर्व खासदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले आहेत. आता कितीही चढउतार आले तरी आम्ही सर्वजण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहोत. त्यामुळे जे कुणी पुड्या सोडत आहेत, त्यांनी हे पाहून घ्यावं. असा ठाम विश्वास अरविंद सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

जसप्रीत बुमराह Champions Trophy 2025 खेळणार नाही? हर्षित राणाच्या एकदिवसीय

Web Title: Uddhav thackeray shivsena eknath shinde shivsena maharashtra politics nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
3

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब
4

Ramdas Kadam: “उद्धवजींनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा…; रामदास कदम यांनी फोडला राजकीय बॉम्ब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.