वासुदेव आला हो वासुदेव आला ! विधानसभा निवडणुकीची अनोखी जनजागृती मोहिम, पाहा फोटो
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात मतदार जनजागृतिसाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रमाची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे.
याच अनुषंगाने कल्याण पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ आणि सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणमध्ये वासुदेवांमार्फत रॅली काढण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, ड प्रभाग कार्यालय, शनि मंदीर, काटेमानेवाली, जाईबाई विद्यालय, पावशे पाडा, काटेमानेवाली गांव, हनुमान नगर, निर्मला स्मृती, वालधुनी रेल्वे ब्रीज, कल्पविला, नेने वाडी, मयूर सदन, समता कॉलनी, या परिसरात वासुदेवांमार्फत नागरिकांमध्ये जाऊन मतदान जनजागृती कार्यक्रम करण्यात आला.
या परिसरात लाऊड स्पिकरद्वारे मतदान जनजागृतीपर गीत लावण्यात आले होत. जनजागृतीचे स्टिकर्स, पत्रके नागरिकांना वाटप करुननागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी या मोहिमेची जबाबदारी सांभाळत होते .