crime (फोटो सौजन्य: social media)
कल्याण परिमंडळ कल्याण परिमंडळ 3 च्या पथकाने तब्बल 1800 किमी प्रवास करून आंतरराज्य गांजा तस्कर रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या ऑपरेशन पोलिसांनी तब्बल 22 दिवस जंगलात मोहीम राबवत 13 तस्करांना बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्या ताब्यातून 115 किलो गांजा जप्त करण्या आला आहे. त्याची किंमत अंदाजे 70 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे जंगलात मोबाईल नेटवर्क नसल्याने ही टोळी वॉकी-टॉकीचा वापर करत तस्करी करत होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध 1 पीडेतूल पिस्तूल, जिवंत काडतुसे, 2 वॉकी टॉकी, 2 कार, रिक्षा, बुलेट व इतर दुचाकी जप्त केल्या आहेत.
सख्खा भाऊ बनला पक्का वैरी ! फक्त मुगाच्या शेंगा तोडल्याने धाकट्याने केला मोठ्या भावाचा खून
कशी राबवली मोहीम
सुरुवातीला कल्याणमधील आंबिवली येथे 100 ग्रॅम गांज्यासह एका तरुणाला अटक झाली होती. त्यानंतर तपास वाढवत नेमका गांजा कुठून येतो? टोळीचा सूत्रधार टोळीचा सूत्रधार कोण आहे? याचा शोध घेण्यात आला. अखेर हा तपास विशाखापट्टणमच्या जंगलात जाऊन थांबला आणि तिथून तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. जंगलात मोबाईल नेटवर्क नसल्याने या टोळीने वॉकी टॉकीचा वापर सुरू केला होता. इतकेच नव्हे तर जंगलातून बाहेर पडणाऱ्या गाड्यांच्या मागे आणखी गाड्या ठेवून सतत लक्ष ठेवले जात होते. अशा पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून ही तस्करी सुरू होती.
अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार
या संपूर्ण कारवाईत अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, डीसीपी अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मारुती आंधळे आणि पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. 22 दिवस चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी अटक केलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर महाराष्ट्राबरोबरच आंध्रप्रदेश व तेलंगणातही गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
धक्कदायक! 10 वर्षाच्या मुलाला टायफॉईड आणि निमोनियाची लागण, मात्र डॉक्टरांनी दिले भलत्याच रुग्णाची औषध
कल्याणमधून डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. 10 वर्षाच्या मुलाला टायफाईड आणि निमोनियाची लागण झाला होती. त्याच्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबीयांनी कल्याण आधारवाडी चौकातील मनोमेय मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुलाचा उपचार करून या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र संबंधित डॉक्टरने या मुलाला टायफाईड निमोनियाच्या औषधांसह दुसऱ्याच रुग्णाची औषधे देखील प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिली आहे. मुलाचे नातेवाईक मुलाला घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. जर ही औषधें आजारी मुलाने घेतली असती तर त्याच्या आरोग्याला उपाय होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता होती.