Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळाडूंना विमा सुरक्षा आणि शिष्यवृत्ती मिळणार, हरभजन सिंगच्या उपस्थितीत खासदार क्रीडा संग्रामच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतील सांसद खेल महोत्सवाच्या धर्तीवर कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या खासदार क्रीडा संग्राम या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2025 | 04:42 PM
खेळाडूंना विमा सुरक्षा आणि शिष्यवृत्ती मिळणार (फोटो सौजन्य-X)

खेळाडूंना विमा सुरक्षा आणि शिष्यवृत्ती मिळणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : कल्याण लोकसभा मतदार संघातले शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पेनतून साकारलेल्या खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचा शानदार शुभारंभ सोहळा आज ठाण्यात पार पडला. यंदा खासदार क्रीडासंग्रामचे दुसरे वर्ष आहे. येत्या १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून यात १ लाख खेळाडू सहभागी होतील. या शुभारंभ सोहळ्याला खासदार डॉ. शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, भारताचा माजी क्रिकेटपटू व खासदार हरभजनसिंग आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

झिम्बाब्वेला मोठा झटका! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघाचा कर्णधार बाहेर

खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले की, खासदार क्रीडासंग्राम ही केवळ स्पर्धा नसून प्रेरणादायी चळवळ आणि तरुणाईला योग्य दिशेने नेणारी संकल्पना आहे. इनडोअर, आऊटडोअर खेळांसोबतच लेझीम, प्रो गोविंदा, ढोलताशा स्पर्धा अशा भारतीय खेळांचाही यंदा खासदार क्रीडासंग्राममध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होऊ शकतील, असे ते म्हणाले. गोविंदा उत्सवाला खेळाचा दर्जा देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वर्षानुवर्ष सराव करणाऱ्या गोविंदांना प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होता येईल, असे ते म्हणाले.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या वर्षी खासदारांना सांसद खेल महोत्सव आयोजित करण्याचे आवाहन केले. मात्र याची सुरुवात गेल्या वर्षीपासून आपण खासदार क्रीडासंग्राम आयोजित करत आहोत, असे ते म्हणाले. मागील वर्षी या महोत्सवात ३० हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यंदा एक लाख खेळाडू सहभागी होतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. खेळ व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, संघभावना, मेहनत आणि आत्मविश्वास वाढवतो. देशाच्या प्रगतीत खेळांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे ते म्हणाले. खेलो इंडिया”, “फिट इंडिया मूव्हमेंट” सारख्या उपक्रमांमुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तर गाठत आहेत. नवे खेळाडू, नवी ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वास दिसणार आहे. कल्याण मतदारसंघाला क्रीडाक्षेत्रात नवे स्थान मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे, असे ते म्हणाले. स्थानिक खेळाडूंना खासदार क्रीडासंग्रामच्या निमित्ताने मोठ्या मंचावर चमक दाखवण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले. या महोत्सवाची विस्तृत माहिती ९३३८५६७५६७ क्रमांकावर उपलब्ध आहे. या क्रमांकाला मिस्ड कॉल दिल्यास एक लिंक पाठवली जाईल, ज्यात महोत्सवातील स्पर्धेची माहिती मिळेल, असे ते म्हणाले.

खेळाडूंना विमा सुरक्षा

खासदार क्रीडासंग्राम महोत्सवात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विमा सुरक्षा दिली जाणार आहे. त्याचबरोबर निवडक खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती देणार आहोत, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यंदा महोत्सवात एक लाख खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. या सर्व खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी विमा कवच उपलब्ध होणार आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

खासदार क्रीडासंग्राम महोत्सव २०२५

कालावधी – १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५

ठिकाण – अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे आयोजन होणार आहे.

इनडोअर खेळ: बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, कॅरम.

आऊटडोअर खेळ: ऍथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, मल्लखांब, व्हॉलीबॉल, आर्चरी, टग ऑफ वॉर.

पारंपरिक खेळ: पोहणे, हाफ मॅरेथॉन, अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यत.

२१ वर्षीय फलंदाजाचा दुलीप ट्रॉफीमध्ये धुमाकूळ! दानिश मालेवारचे नॉर्थ ईस्टविरुद्ध द्विशतकी तडाखा 

Web Title: Thane dr shrikant shinde launches 2nd khasdar krida sagram with scholarships and insurance to athletes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • kalyan
  • lok sabha
  • Sports

संबंधित बातम्या

Women’s World Cup : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये बदल करेल का? इंग्लिश टीम उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर
1

Women’s World Cup : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध प्लेइंग 11 मध्ये बदल करेल का? इंग्लिश टीम उपांत्य फेरीपासून फक्त एक पाऊल दूर

Smriti Mandhana लवकरच होणार इंदौरची सून, fiancé पलाशने केला खुलासा!
2

Smriti Mandhana लवकरच होणार इंदौरची सून, fiancé पलाशने केला खुलासा!

Ranji Trophy 2025 : रिंकू सिंगने झळकावले शतक! उत्तर प्रदेशला संकटातून काढले बाहेर, वाचा सविस्तर
3

Ranji Trophy 2025 : रिंकू सिंगने झळकावले शतक! उत्तर प्रदेशला संकटातून काढले बाहेर, वाचा सविस्तर

India vs Australia Live : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे स्थान आणि वेळ बदलली, वाचा मॅचची सविस्तर माहिती
4

India vs Australia Live : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे स्थान आणि वेळ बदलली, वाचा मॅचची सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.