
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 11 नोव्हेंबरला मतदान; आज थंडावणार प्रचारतोफा
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पूर्ण झाले. यामध्ये 121 जागांसाठी मतदान झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची वेळ आली आहे. 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. १८ जिल्ह्यांमधील १२२ जागांवर मतदार १३०२ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. रविवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असेल, म्हणूनच राजकीय पक्षांनी त्यांचे प्रचाराचे प्रयत्न दुसऱ्या टप्प्यावर केंद्रित केले आहेत. या टप्प्यात एनडीएकडून चंपारण्य पट्टा, मिथिला आणि सीमांचल प्रदेशांसह बिहारमधील जागांवर मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात एनडीएची विश्वासार्हता पणाला लागली असली तरी, भाजपची खरी परीक्षा दुसऱ्या टप्प्यात आहे. शिवाय, केवळ राजदच नाही तर काँग्रेसलाही स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान असेल, तर असदुद्दीन ओवैसी यांना बिहारमध्ये त्यांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल. 2020 मध्ये ओवैसी यांनी या टप्प्यात जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले.
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. पश्चिम आणि पूर्व चंपारण, सीतामढी, शिवहार, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. भागलपूर, बांका, जमुई, नवादा, गया, औरंगाबाद, जहानाबाद, अरवल, कैमूर आणि रोहतास जिल्ह्यांमध्येही मतदान होणार आहे.
गयाजी, औरंगाबाद, सीतामढीसारखे जिल्हे
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधील जागांसाठी निवडणुका होतील. ११ नोव्हेंबर रोजी गयाजी जिल्ह्यातील १०, कैमूर जिल्ह्यातील ४, रोहतास जिल्ह्यातील ७, औरंगाबाद जिल्हातील ६, अरवल जिल्ह्यातील २, जहानाबाद जिल्ह्यातील ३, नवादा जिल्ह्यातील ५, भागलपूर जिल्हातीन ७, बांका जिल्ह्यातील ५, जमुई जिल्ह्यातील ४, सीतामढ़ी जिल्ह्यातील ८, शिवहर जिल्ह्यातील १, मधुबनी जिल्ह्यातील १०, सुपौल जिल्ह्यातील ५, पूर्णिया जिल्ह्यातील ७, अररिया जिल्ह्यातील ६, कटिहार जिल्ह्यातील ७, किशनगंज जिल्ह्यातील ४, पूर्व चंपारण जिल्ह्यातील १२ आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यातील ९ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे.
बिहार निवडणुकीत महिला मतदार ‘किंगमेकर’
संसदेत २०२३ मध्ये, महिला आरक्षण विधेयकाला संसदेतील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्याला नारी शक्ती वंदन (१२८ वी सुधारणा) कायदा असे म्हणतात. या कायद्याचे उद्दिष्ट संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण देणे आहे,. विधानसभा आणि लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी हा कायदा मंजूर करण्यात आला होता. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष महिलांच्या सहभागाबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही.
हेदेखील वाचा : Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीत महिला मतदार ‘किंगमेकर’;मग उमेदवारी मर्यादित का?