Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर विधानभवन विस्तार इमारतीसह, मुंबईतील मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी; राम शिंदे यांनी घेतला आढावा

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी नागपूर येथील विधानभवन विस्तार प्रकल्प तसेच मुंबई येथील मनोरा आमदार निवास, अजंठा बंगला पुनर्बांधणी आणि मॅजेस्टिक इमारत पुनर्बांधणी कामाचा आढावा घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 10, 2026 | 06:00 PM
Nagpur Vidhan Bhavan Extensi , Reconstruction of Manora MLA Residence in Mumbai Ram Shinde Review

Nagpur Vidhan Bhavan Extensi , Reconstruction of Manora MLA Residence in Mumbai Ram Shinde Review

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतला आढावा
  • अजंठा बंगला पुनर्बांधणी आणि मॅजेस्टिक इमारत पुनर्बांधणीचा आढावा
  • सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी
Ram Shinde : मुंबई : नागपूर येथील विधानभवन विस्तार प्रकल्प तसेच मुंबई येथील मनोरा आमदार निवास, अजंठा बंगला पुनर्बांधणी आणि मॅजेस्टिक इमारत पुनर्बांधणी कामाचा विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आज सविस्तर आढावा घेऊन या नवीन इमारती सर्व सुविधायुक्त, दर्जेदार होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या. (Political News)

या इमारतींच्या बांधकाम आढावा बैठकीत नागपूर विधानभवन विस्तारांतर्गत प्रस्तावित नवीन इमारत, मनोरा आमदार निवास, अजंठा बंगला पुनर्बांधणी आणि मॅजेस्टिक इमारत पुनर्बांधणी बांधकामासंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले. मनोरा आमदार निवास इमारत मार्च २०२८ तर मॅजेस्टिक इमारत ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, या इमारतींचे बांधकाम करताना गुणवत्ता, सुरक्षितता व वेळेचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रकल्पाची वेळेत पूर्तता होण्यासाठी नियमित आढावा बैठक घेण्यात यावी. नागपूर विधानभवन विस्तार प्रकल्पाचा आढावा घेताना सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले, नवी इमारत सर्व सुविधायुक्त असावी. अंतर्गत व्यवस्था दर्जेदार असाव्यात.

हे देखील वाचा : परभणीत भाजपने मारली जोरदार मुसंडी; कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाहीच

मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी प्रकल्पाचा आढावा बैठकीत पुनर्बांधणीच्या कामाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली प्रगती, उर्वरित कामांचे नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.आमदारांसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने विहित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी सुचित केले. तसेच या इमारतीच्या बांधकामाचे त्रयस्थ व्यक्ती अथवा संस्थेकडून ऑडिट करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हे देखील वाचा : “सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू,” नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले…

अंजठा बंगला आणि मॅजेस्टिक इमारतीच्या पुनर्बांधणी प्रकल्पांचाही स्वतंत्रपणे आढावा घेण्यात आला. अंजठा बंगल्याच्या पुनर्बांधणीसाठी त्याचे ऐतिहासिक व प्रशासकीय महत्त्व लक्षात घेऊन काम करण्याचा सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या आढावा बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

Web Title: Nagpur vidhan bhavan extensi reconstruction of manora mla residence in mumbai ram shinde review

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • daily news
  • political news
  • ram shinde

संबंधित बातम्या

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान
1

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.