Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhjeet Dipke News: कॉकरोच जनता पार्टीची काय असेल पुढची रणनीती? अभिजीत दिपकेंनी स्पष्टच सांगितले

सरकारशी चर्चा अद्याप सुरू असल्याचे सांगताना दीपके यांनी NEET वादात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी  करण्यात आली आहे. मात्र, सरकारने अद्याप यावर ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.  

  • By anuradha sagar
Updated On: Jul 31, 2026 | 05:21 PM
'लाठीमारामुळे आंदोलन आणखी मोठं झालं'; जंतर-मंतर आंदोलनावर अभिजीत दिपकेंचं मोठं विधान

'लाठीमारामुळे आंदोलन आणखी मोठं झालं'; जंतर-मंतर आंदोलनावर अभिजीत दिपकेंचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:

 

Abhjeet Dipke News:  पेपर लीक दुरुस्ती विधेयक  पेपर लीक रोखण्याऐवजी, पेपर लीकनंतर करावयाच्या कारवाईवर अधिक लक्ष केंद्रित करते. त्यांनी सांगितले की, अशा घटना घडू नयेत यासाठी आंदोलनाचा उद्देश होता, परंतु सरकारने असा कायदा केला आहे जो पेपर लीकनंतर शिक्षा आणि कारवाईवर लक्ष केंद्रित करतो.” अशी प्रतिक्रीया कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी दिली आहे.

‘कठोर शिक्षा पुरेशी नाही, प्रतिबंधात्मक व्यवस्था मजबूत करा’

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिजित दीपकेंनी गेल्या सीजेपी आंदोलन, पेपर लीक विधेयक आणि सीजेपीच्या भविष्यासह अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. पेपर लीक दुरुस्ती विधेयकाबाबत विचारलेल्या प्रश्नावर दीपके म्हणाले की, या कायद्यात तुरुंगवासाची शिक्षा चार वर्षांवरून दहा वर्षांपर्यंत वाढविण्यात आली असून दंडाची रक्कमही वाढविण्यात आली आहे.   याचा अर्थ सरकारने पेपरफुटी होणारच असे गृहीत धरल्यासारखे आहे. सरकारने शिक्षेवर भर देण्याऐवजी पेपरफुटी रोखण्यासाठीची संपूर्ण यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

Abhijeet Dipke on Amit Shah: ‘अमित शाह यांच्या आदेशावरूनच…’, अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप, तर केंद्र सरकारवरही टीकेचे बाण

पंतप्रधानांनी फास्ट ट्रॅक न्यायालयांची घोषणा केली होती, मात्र पहिल्याच सुनावणीत सीबीआयची बाजू उपस्थित नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागली. त्यामुळे सरकारच्या हेतूबाबत शंका निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

पीडित कुटुंबांना मदतीच्या मुद्द्यावर सरकारवर प्रश्न

सरकारशी चर्चा अद्याप सुरू असल्याचे सांगताना दीपके यांनी NEET वादात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी  करण्यात आली आहे. मात्र, सरकारने अद्याप यावर ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.  मोठ्या राजकीय निर्णयांसाठी सरकार तातडीने निधी उपलब्ध करून देते, मात्र पीडित कुटुंबांच्या मदतीबाबत विलंब होत आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झालेले बदल हे आंदोलनाच्या दबावामुळेच झाल्याचा दावाही त्यांनी केला.

 

पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत बोलताना दीपके म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला शिक्षणाच्या प्रश्नावर सार्वजनिक भूमिका घ्यावी लागली, ही विद्यार्थ्यांची मोठी  जीत आहे. मात्र, नव्या शिक्षणमंत्र्यांच्या नियुक्तीवर त्यांनी आक्षेप घेतला. तसेच शिक्षण विभागातील नव्या अधिकाऱ्यांवरही यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचा दावा करत, एका व्यक्तीला हटवून दुसऱ्याला संधी देण्याने मूलभूत बदल होणार नाही, असे ते म्हणाले.

Abhijeet Dipke: ‘भाजपामध्ये या नाहीतर…’; CJP प्रमुख अभिजित दीपकेचा खळबळजनक दावा! तर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया समोर…

‘विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत’

विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई आणि आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत दीपके यांनी सरकारने सर्व शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी केली. अन्यथा विद्यार्थ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. जनतेचा रोष एखाद्या एका मंत्र्याविरोधात नसून संपूर्ण व्यवस्थेविरोधात आहे. त्यामुळे केवळ मंत्र्यांचा राजीनामा हा प्रश्नाचे उत्तर ठरू शकत नाही.

’20 जुलैपूर्वीच सरकारने संपर्क साधला होता’

सरकारकडून पहिल्यांदा संपर्क कधी साधण्यात आला, याबाबत दीपके यांनी सांगितले की, 20 जुलैच्या ‘संसद चलो’ आंदोलनापूर्वीच प्रशासनाने संपर्क साधला होता. सुरुवातीला पोलिसांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांशी नव्हे तर थेट केंद्र सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वाशीच चर्चा होईल, अशी भूमिका आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: What will be the cockroach janata partys next strategy abhijeet dipke stated it clearly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा
1

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.