Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“५ वर्षांत मुंब्र्यात फक्त MIM…”, जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणारी Sahar Shaikh कोण आहे?

Sahar Shaikh: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्र्यात एआयएमआयएमने मोठी मुसंडी मारली आहे. नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाडांच्या गडाला सुरुंग लावत संपूर्ण मुंब्रा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 20, 2026 | 08:31 PM
जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणारी Sahar Shaikh कोण आहे? (Photo Credit- X)

जितेंद्र आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देणारी Sahar Shaikh कोण आहे? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंब्र्यात आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला खिंडार!
  • AIMIM ची मोठी मुसंडी; ‘संपूर्ण मुंब्रा हिरवा करू’
  • सहर शेख यांचा थेट इशारा
ठाणे: राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विशेषतः ठाणे महानगरपालिकेत (TMC) ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा या बालेकिल्ल्याला असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम (AIMIM) पक्षाने जबरदस्त सुरुंग लावला आहे.

आव्हाडांच्या ‘होम ग्राउंड’वर एमआयएमचा धमाका

राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी १३ महानगरपालिकांमध्ये एमआयएमने आपली मजबूत उपस्थिती नोंदवत एकूण १२५ जागांवर विजय मिळवला आहे. एकट्या ठाणे महानगरपालिकेत पक्षाचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. या विजयातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३०. येथे एमआयएमच्या संपूर्ण पॅनलने दणदणीत विजय मिळवला असून, आव्हाडांचे एकेकाळचे कट्टर समर्थक युनूस शेख यांच्या कन्या सहर शेख यांनी मुंब्र्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे.

कोण आहे सहर शेख? Who is Sahar Shaikh?

विजयानंतर नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी काढलेली विजयी मिरवणूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये सहर शेख यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. त्या म्हणतात, पुढील निवडणुकीत आम्ही संपूर्ण मुंब्रा विधानसभा मतदारसंघ जिंकू. आम्ही आमच्या विरोधकांना येथून हाकलून लावू आणि मुंब्र्यातील प्रत्येक उमेदवार एआयएमआयएमचाच असेल. येत्या काळात संपूर्ण मुंब्रा ‘हिरवा’ होईल.” त्यांच्या या विधानामुळे मुंब्रा-कळवा पट्ट्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Youngest AIMIM elected councilor Sahar Shaikh from Mumbra#BMCElection2026 https://t.co/TVAsjHXohW pic.twitter.com/QpCI6tk7kD — Adil (@_Adil_Waseem) January 20, 2026

“हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या…” नाना पटोलेंचं भाजपला खुलं आव्हान; शिंदे-अजित पवारांबाबत केला मोठा दावा

मैत्रीचे रूपांतर कटु शत्रुत्वात

सहर शेख या जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळी उजवे हात मानले जाणारे युनूस शेख यांच्या कन्या आहेत. आव्हाड आणि युनूस शेख यांची अनेक वर्षांची मैत्री आता कट्टर राजकीय शत्रुत्वात बदलली आहे. सहर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण वर्ग आणि महिलांची मोठी फळी उभारली होती, ज्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. सहर यांच्यासोबतच नफीस अन्सारी, शेख सुलताना आणि डोंगरे शोएब फरीद यांनीही मुंब्र्यात मोठे विजय मिळवले आहेत.

राष्ट्रवादीतील अंतर्गत फुटीचा फायदा

मुंब्रा आणि कळवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्षाचा थेट फायदा ओवेसींच्या ‘पतंग’ला झाला आहे. गेल्या निवडणुकीत मुंब्र्यात एमआयएमचे फक्त २ नगरसेवक होते, ती संख्या आता ५ वर पोहोचली आहे.

युनूस शेख यांचा आव्हाडांवर थेट प्रहार

विजयानंतर युनूस शेख यांनीही जितेंद्र आव्हाडांना जाहीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, “माझ्या नादी लागू नका, अन्यथा मी परिस्थिती आणखी बिकट करेन. तुम्ही ज्यांना घेऊन फिरत आहात ते काहीच नाहीत, खरे सिंह आमच्याकडे आहेत. जर तुम्ही आमच्या वाटेला आलात, तर त्याचे परिणाम भयानक होतील. जितेंद्र आव्हाड गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, मात्र सहर शेख यांच्या या विजयाने आव्हाडांच्या गडाला मोठे आव्हान उभे केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंब्र्यात ‘आव्हाड विरुद्ध एमआयएम’ असा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

BMC Mayor च्या निवडणुकीत AIMIM भाजपला पाठिंबा देणार का? “मॅच फिक्सिंग” आरोपांना प्रत्युत्तर देत ओवेसी नेमकं काय म्हणाले?

Web Title: Who is sahar shaikh who is challenging jitendra awhad in his own stronghold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • Thane Municipal Corporation

संबंधित बातम्या

Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला
1

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.