Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : युवक काँग्रेसची जाहीर केलेली कार्यकारिणी 48 तासांतच रद्द; काँग्रेसमध्ये एकच खळबळ

चार पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडल्याने राऊत यांनी कायमचे बडतर्फही केले होते. तर, पुढील निवडणूक लढवायची असल्याने कुरघोडी करीत शिवानी वडेट्टीवार, अनुराग भोयर, केतन ठाकरे यांना हटविल्याचीही चर्चा आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2025 | 09:25 AM
बुलडाण्यात काँग्रेस, भाजपमध्ये संघटनात्मक बदल; नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी

बुलडाण्यात काँग्रेस, भाजपमध्ये संघटनात्मक बदल; नवीन चेहऱ्यांना मिळाली संधी

Follow Us
Follow Us:

नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात राज्यातील युवक कॉंग्रेस गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत आहे. सातत्याने घेत असलेल्या निर्णयाची राज्यात जोरदार चर्चा होत असून, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी जाहीर केलेल्या विस्तारित 276 जणांची कार्यकारिणी राष्ट्रीय समितीने 48 तासांतच आदेश जारी करत रद्द केली. यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कुणाल राऊत यांनी कुठलीही पूर्वपरवानगी न घेता तसेच प्रक्रिया पूर्ण न करता ही कार्यकारिणी घोषित केली, असा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पदमुक्त करण्यात आलेले केतन विकास ठाकरे यांना पुन्हा कार्यकारिणीत घेऊन अनेकांना आश्चर्याचा धक्काच दिला. राष्ट्रीय सचिव तथा प्रदेश प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी कुमार रोहित आणि एहसान अहमद खान यांनीही याबाबत शिस्तपालन समितीला गांभीर्याने हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राऊत यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. कुणाल हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिंरजीव आहेत. याआधीही त्यांचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत.

कार्यकाळही वादग्रस्त

कुणाल राऊत यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला आहे. नियुक्तीपासून इतर पदाधिकाऱ्यांमध्ये वाद व संघर्ष सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी प्रचारात व्यस्त असतानाही त्यांनी ठपका ठेवत अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तर, नागपुरात सरसंघचालकांच्या विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनानंतर घाईगदींत 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले. काहींना निलंबितही केले.

चारा पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केलं

चार पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडल्याने त्यांना राऊत यांनी कायमचे बडतर्फही करण्यात आले होते. तर, पुढील निवडणूक लढवायची असल्याने कुरघोडी करीत शिवानी वडेट्टीवार, अनुराग भोयर, केतन ठाकरे यांना हटविल्याचीही चर्चा आहे. यामुळेच शिवराज मोरे यास कार्याध्यक्ष नेमले होते. त्यांनी पुन्हा एकदा कोणत्याही अधिकाराशिवाय विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली. बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास राष्ट्रीय नेत्यांनी कार्यकारिणीची बैठक रद्द केली.

Web Title: Youth congress announced executive committee cancelled within 48 hours nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • Congress Politics
  • Indian Political News
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
2

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
3

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब
4

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.