
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुतीतील माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुका आठवडाभरात जाहीर होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेतून आणखी ४० लाख महिला अपात्रतेच्या मार्गावर?
महापालिका निवडणुकांबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यास राज्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत. सर्व पक्षांकडून तयारीला वेग आला असून, ग्रामीण राजकारणही तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंयातीच्या निवडणुका पार पडल्या. तर आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालायात प्रलंबित असल्यामुळे महापालिका निवडणुकांच्या घोषणांना उशीर झाला. पण जानेवारी 2026 मध्ये राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर शेवटच्या म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषद आणि पंचायत समितच्या निवडणुका होतील. राज्यात गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंतायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. पण आता याच आठवड्याभरात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची संभाव्य तारीख समोर आली आहे. (Maharashtra local body elections 32 ZP ELection schedule)
राज्यातील ३१ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होऊ शकतात. राज्यातील पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, नांदेड, बीड आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या ठिकाणच्या निवडणुकांच्या प्रक्रियांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
Bangladesh Election: बांगलादेशात राजकीय अस्थिरतेदरम्यान युनूस यांची मोठी घोषणा;
नगरपरिषद निवडणुकांतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. या सगळ्यात मंचरमध्ये विकासकामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा परिषदांवर भाष्य केलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा कधी होणार असा सवाल विचारला असता त्यांनी यावर भाष्य केलं. येत्या चार- आठ दिवसांत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होईल, असं सांगितलं आहे. यापूर्वीही त्यांनी नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या अचूक तारखां सांगितल्या होत्या.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ च्या आधी राज्यातील सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसोबतच राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी किंवा सोमवारी या निवडणुकाच्या घोषणा होऊ शकतात.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, निवडणूक प्रक्रियेचा संभाव्य आराखडा जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. यानंतर उमेदवारांना दोन दिवस अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाईल. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 आणि 29 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडू शकते, तर त्याच दिवशी किंवा लगेच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.