Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव जिल्ह्यात ६५.२२ टक्के मतदान; भूम–परांड्यात सर्वाधिक तर लोहाऱ्यात झाले सर्वात कमी मतदान

धाराशिव जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी समाधानकारक प्रतिसाद देत एकूण ६५.२२ टक्के मतदान केले. यानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2026 | 03:56 PM
Zilla Parishad and Panchayat Samiti elections, 65.22 percent voting was recorded in Dharashiv

Zilla Parishad and Panchayat Samiti elections, 65.22 percent voting was recorded in Dharashiv

Follow Us
Follow Us:

धाराशिव : राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल (दि.07) मतदान पार पडले असून उद्या (दि.09) निकाल हाती येणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी (Election Result) समाधानकारक प्रतिसाद देत एकूण ६५.२२ टक्के मतदान केले. जिल्ह्यातील एकूण ११ लाख ४५ हजार ८८८ मतदारांपैकी अंदाजे ७ लाख ४७ हजार ३७० मतदारांनी आपला लोकशाही हक्क बजावला. (Political News)

सकाळी मतदानाचा संथ प्रारंभ, दुपारनंतर वाढला वेग

मतदानाच्या पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत केवळ ७.४७ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११.३० वाजेपर्यंत ही टक्केवारी वाढून २१.८९ टक्के झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३६.६० टक्के, तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५०.०७ टक्के मतदान नोंदवण्यात आले. दुपारनंतर आणि सायंकाळच्या सत्रात मतदानाचा वेग लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.

हे देखील वाचा : ११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी

  • धाराशिव : ६३.७३%
  • तुळजापूर : ६४.७२%
  • उमरगा : ६१.१८%
  • लोहारा : ५७.३२%
  • भूम : ७१.६६%
  • परांडा : ७१.६२%
  • कळंब : ६६.६९%
  • वाशी : ६९.६०%
    यामध्ये भूम आणि परांडा तालुक्यांत सर्वाधिक मतदान, तर लोहारा तालुक्यात सर्वात कमी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांचा चांगला सहभाग दिसून आला. दुपारच्या वेळेत उन्हामुळे काही मतदान केंद्रांवर गर्दी कमी झाली असली, तरी सायंकाळी पुन्हा एकदा मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

प्रशासनाची चोख तयारी

निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, निवडणूक अधिकारी व पोलीस यंत्रणा सज्ज होती. मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात कुठेही मोठी अनुचित घटना घडल्याची नोंद नाही.

हे देखील वाचा : उत्सुकता शिगेला! दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

राजकीय गणितांवर परिणाम
जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नोंदवलेला उच्च मतदानाचा टक्का अंतिम निकालावर निर्णायक ठरण्याची शक्यता असून, भूम, परांडा व वाशी तालुक्यांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. एकूणच, धाराशिव जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, समाधानकारक मतदान टक्केवारीमुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Zilla parishad and panchayat samiti elections 6522 percent voting was recorded in dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Election News
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
2

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.