Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

राज्यभरातील ७४३८ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले आहे. निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार असून, त्यानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 08, 2026 | 08:31 AM
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचे मतदान पूर्ण; उद्या निकाल

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी शनिवारी मतदान पूर्ण झाले. आता या निवडणुकीचे निकाल उद्या (दि.9) जाहीर केले जाणार आहेत. यापूर्वी ५ फेब्रुवारीला होणारे मतदान तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. या निवडणुकीत राज्यभरातील ७४३८ उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले आहे.

निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार असून, त्यानंतर आचारसंहिता उठवली जाणार आहे. १२ जिल्हा परिषद क्षेत्रात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी एकूण २६२४ उमेदवार रिंगणात आहेत. राज्य आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजेपर्यंत अंदाजे ३७.९४% मतदान झाले होते. रायगड, सोलापूर, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ईव्हीएम संदर्भात तक्रारी समोर आल्या असून, अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प झाली होती.

अलिबाग येथील कावीर येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान थांबवावे लागले. त्यामुळे भर उन्हात मतदारांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले. तर कर्जत तालुक्यातील हलवली येथील मतदान केंद्रावरही अशाच प्रकारचा बिघाड झाल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

ईव्हीएम सुरुच झालं नाही

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पाथुर्डी (केंद्र क्र. २२४) येथे ईव्हीएम सुरूच न झाल्याने सकाळच्या सत्रात मतदान रखडले. वेळ होऊनही मशीन प्रतिसाद देत नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तर छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथे मत नोंदवल्यानंतर अपेक्षित बीप आवाज येत नसल्याने मतदान तात्पुरते थांबवण्यात आले.

नावांबाबत होता किरकोळ गोंधळ

काही ठिकाणी सकाळच्या वेळेत मतदार यादीतील नावांबाबत किरकोळ गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाने तातडीने मदत कक्ष सक्रिय करून समस्या सोडवल्याने मतदानावर फारसा परिणाम झाला नाही. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी राखीव यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

स्थानिक प्रश्नांवर मतदारांचे मतदान

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर मतदारांनी मतदान केल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास हे मुद्दे केंद्रस्थानी असल्याचे मतदारांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झाले. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आज प्रत्यक्ष निर्णयाचा दिवस असल्याची भावना सर्वत्र जाणवत होती.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव

Web Title: Results of zilla parishad and panchayat samiti elections will be declared tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Panchayat Samiti Elections
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी
1

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
2

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका
3

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
4

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.