Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देहूगावात निवडणुकीचा धुरळा! राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला, अर्ज दाखल

सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. निवडणुकीचे वारे देहूगावात सुद्धा वाहत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 21, 2026 | 08:42 PM
देहूगावात निवडणुकीचा धुरळा! राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला

देहूगावात निवडणुकीचा धुरळा! राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 चे जोरदार वारे
  • म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ
  • जिल्हा परिषद सदस्य पदासाठी गणेश बौत्रे तर पंचायत समिती सदस्य पदासाठी आश्विन तरस
बद्रीनारायण घुगे/देहूगांव: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज म्हाळुंगे नाणेकर गटात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात पार पडला. सकाळपासूनच परिसरात राजकीय हालचालींना वेग आला होता. ढोल-ताशांचा गजर, घोषणांचा निनाद आणि घड्याळ चिन्ह असलेल्या उपरण्यांमुळे संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रचाररॅलीतून राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.

प्रचाराच्या शुभारंभापूर्वी उमेदवारांनी येलवाडी-सावरदरी-म्हाळुंगे येथील आराध्य दैवत जोपाई देवी तसेच मातांचे दर्शन घेतले. देवदर्शनानंतर विजयासाठी आशीर्वाद मागत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली. धार्मिक परंपरा आणि राजकीय संकल्प यांचा सुंदर संगम या प्रसंगी पाहायला मिळाला. देवाची कृपा आणि जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास उमेदवारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

KDMC Politics: मनसेचा शिंदेंना पाठिंबा, राज ठाकरे नाराज? संजय राऊतांनी कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ निर्णयावर फोडला बॉम्ब

या रॅलीत म्हाळुंगे नाणेकर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार गणेश बोत्रै तसेच पंचायत समिती गणाच्या उमेदवार आश्विन तरस यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते, माजी लोकप्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिस्तबद्ध रॅली आणि मोठी उपस्थिती यामुळे राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली.

रॅलीदरम्यान म्हाळुंगे नाणेकर परिसरातील सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. महिला भगिनींनी पारंपरिक वेशात सहभाग नोंदवत रॅलीची शोभा वाढवली, तर युवक-युवतींनी जोरदार घोषणा देत वातावरण अधिक भारावून टाकले. ज्येष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. अनेकांच्या गळ्यात घड्याळ चिन्ह असलेल्या उपरण्या झळकत होत्या, तर दुचाकी वाहनांवर घड्याळाचे झेंडे फडकत होते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी रॅलीचे स्वागत करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

Maharashtra Politics: कोल्हापुरात राजकीय भूकंप? हसन मुश्रीफांना मोठा धक्का; नेमका विषय काय?

यावेळी उमेदवारांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करत आपली भूमिका स्पष्ट केली. “गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि सामान्य माणसाला न्याय देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे,” असे उमेदवारांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा उल्लेख करत, त्या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर घड्याळ चिन्हाचे प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी निवडणुकीत विजयासाठी त्यांनी नागरिकांकडे आशीर्वाद मागितले.

नागरिकांनीही उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत जोरदार पाठिंबा दर्शवला. टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी “घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून सर्व राष्ट्रवादी उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन केले. या कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या एकजुटीचा ठोस संदेश देण्यात आला.

एकूणच म्हाळुंगे नाणेकर गटातून जिल्हा परिषद उमेदवार गणेश बोत्रै आणि पंचायत समिती उमेदवार आश्विन तरस यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र या प्रचाररॅलीतून स्पष्टपणे दिसून आले.

Web Title: Zilla parishad election 2026 in dehugaon national congress candidate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ एकाच वेळी अनेक भाषांमध्ये उपलब्ध; ‘अल्ट्रा प्ले’, ‘अल्ट्रा झकास’वर सीरिज रिलीज
1

‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ एकाच वेळी अनेक भाषांमध्ये उपलब्ध; ‘अल्ट्रा प्ले’, ‘अल्ट्रा झकास’वर सीरिज रिलीज

पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ; ‘देवखेळ’ या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित!
2

पौराणिक कथा, गुन्हा आणि न्यायची सरमिसळ; ‘देवखेळ’ या आगामी वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित!

Chhatrapati Sambhaji Nagar News: शिंदेसेनेशी युतीवरून रणकंदन; छत्रपती संभाजीनगर भाजपात बंडखोरीचे संकेत
3

Chhatrapati Sambhaji Nagar News: शिंदेसेनेशी युतीवरून रणकंदन; छत्रपती संभाजीनगर भाजपात बंडखोरीचे संकेत

Bigg Boss Marathi 6 : घरात पडली वादाची ठिणगी! ड्युटीवरून प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये झाला राडा
4

Bigg Boss Marathi 6 : घरात पडली वादाची ठिणगी! ड्युटीवरून प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये झाला राडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.