Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला पूजा करताना या फुलाचा करा वापर, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचा मिळेल आशीर्वाद

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने धन आणि संपत्ती प्राप्त होते. लक्ष्मी आणि कुबेर यांना कोणते फूल अर्पण करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 18, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • अक्षय्य तृतीयेला पुजेदरम्यान कोणत्या फुलांचा वापर करावा
  • देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचा मिळेल आशीर्वाद
  • कुबेर देवाचे प्रिय फूल कोणते
 

अक्षय्य तृतीया रविवार, 19 एप्रिल रोजी आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी पूजा, स्नान, दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी, विष्णू आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धन आणि वैभव यांच्याशी संबंधित असलेली देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केल्याने धन आणि संपत्ती प्राप्त होते. या दिवशी तुम्ही जे धन, संपती कमावता ते कधी कमी होत नाही. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा कोणत्या फुलाने केल्याने ते प्रसन्न होतील आणि त्यांचा वर्षभर आपल्यावर आशीर्वाद राहील ते जाणून घ्या

अक्षय्य तृतीयेला या फुलांनी करा पूजा

चमेलीचे फूल

अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा चमेलीच्या फुलाने करा. देवी लक्ष्मीला चमेलीचे फूल प्रिय आहे. पांढरे चमेलीचे फूल हे शांती, प्रेम आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते. हे फूल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला लोक सोनं खरेदी का करतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व

कमळाचे फूल

देवी लक्ष्मीला कमळाचे फूल खूप प्रिय आहे. देवी कमळाच्या फुलावर विराजमान झालेली असते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही देवीची पूजा करताना लाल किंवा पांढऱ्या कमळाचा वापर करू शकता. यामुळे तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. कमळाच्या फुलाला सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते.

गुलाबाचे फूल

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही लाल फूल अर्पण करू शकता. देवी लक्ष्मी लाल गुलाबाच्या फुलाने खुश होते. कारण लाल रंग त्यांचा आवडता आहे. लाल गुलाब अर्पण केल्याने पैशांशी. संबंधित समस्या दूर होतात. जीवनात आर्थिक समृध्दी येते.

या तीन फुलांव्यतिरिक्त अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीची पूजा तुम्ही लाल रंगांचे जास्वंदाचे फूल आणि झेंडूच्या फुलाने करू शकता. ही दोन्ही फूल देवी लक्ष्मीला आवडतात.

Akshaya Tritiya 2026: 100 वर्षांनी अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग, या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती

कुबेराचे प्रिय फूल

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धनपतीची पूजा तुम्ही पिवळ्या आणि सोनेरी रंगांच्या फुलाने करू शकता. कुबेरांना प्रसन्न करण्यासाठी झेंडू, पारिजात, कमळ, केतकी आणि पांढरे किंवा पिवळ्या रंगांचे कण्हेराचे फूल अर्पण करा.

पारिजातकाचे फूल

देव वृक्ष पारिजातकाचे फूल शांतता आणि पवित्रतेचे प्रतिक मानले जाते. हे फूल कुबेरांना अर्पण केल्याने सुख, शांती आणि वैभव प्राप्त होते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अक्षय्य तृतीयेला कोणत्या देवतेची पूजा केली जाते

    Ans: अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते

  • Que: पूजेत फुले का वापरली जातात?

    Ans: फुले पवित्रता, सौंदर्य आणि भक्तीचे प्रतीक आहेत. देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी फुले वापरली जातात.

  • Que: अक्षय्य तृतीयेचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: हा दिवस समृद्धी, पुण्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Web Title: Akshaya tritiya use this flower while worshipping on akshaya tritiya and you will get blessings of goddess lakshmi kubera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Akshaya Tritiya
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Sant Surdas: कोण आहे संत सूरदास, जाणून घ्या सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास
1

Sant Surdas: कोण आहे संत सूरदास, जाणून घ्या सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला लोक सोनं खरेदी का करतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व
2

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला लोक सोनं खरेदी का करतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व

Prabhadevi Temple: नवसाला पावणारी प्रभादेवी! गिरणगावातील या मंदिराचा 310 वर्षांचा इतिहास जाणून घ्या
3

Prabhadevi Temple: नवसाला पावणारी प्रभादेवी! गिरणगावातील या मंदिराचा 310 वर्षांचा इतिहास जाणून घ्या

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, पूर्वज होतील प्रसन्न
4

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, पूर्वज होतील प्रसन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.