Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

April Shubh Muhurat 2026: एप्रिल महिन्यात वाहन आणि मालमत्ता खरेदीसाठी कोणते आहेत मुहूर्त, जाणून घ्या

आजपासून एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे आहेत शुभ मुहूर्त. एप्रिल महिन्यात खरेदी करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 01, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • एप्रिल महिन्यात खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त
  • वाहन, मालमत्ता आणि गृप्रवेश करण्यासाठी मुहूर्त
  • कोणती आहेत मुहूर्त
 

जर तुम्ही एप्रिल महिन्यात नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर शुभ मुहूर्त बघणे गरजेचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार योग्य तिथी, नक्षत्र आणि मुहूर्तावर खरेदी केल्याने सुख समृद्धी येते. जर चुकीच्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान आणि समस्या येऊ शकतात. वाहन आणि मालमत्ता खरेदीसाठी काय आहे मुहूर्त जाणून घ्या

एप्रिलमध्ये वाहन खरेदीसाठी मुहूर्त

एप्रिल महिन्यातील काही दिवस असे आहेत त्या दिवशी वाहन खरीदने शुभ मानले जाते. विशेषतः हस्त, चित्रा, अनुराधा, रोहिणी आणि पुष्य नक्षत्र यावेळी वाहन खरेदी करणे उत्तम मानले जाते. एप्रिल महिन्यात वाहन खरेदी करण्यासाठी एकूण 9 शुभ मुहूर्त आहेत.

वाहन खरेदी करण्यासाठी शुभ दिवस

बुधवार, 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 4.17 वाजल्यापासून गुरुवार, 2 एप्रिल रोजी सकाळी 6.10 वाजेपर्यंत यावेळी हस्त पौर्णिमा असेल.

गुरुवार, 2 एप्रिल रोजी सकाळी 6.10 वाजल्यापासून शुक्रवार, 3 एप्रिल रोजी सकाळी 6.09 वाजेपर्यंत यावेळी हस्त चित्रा नक्षत्र असेल.

शुक्रवार, 3 एप्रिल रोजी सकाळी 6.9 वाजल्यापासून 8.42 वाजेपर्यंत चित्रा नक्षत्र असेल.

सोमवार, 6 एप्रिल रोजी दुपारी 2.10 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 2.57 वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र असेल.

रविवार, 12 एप्रिल रोजी पूर्ण दिवस मुहूर्त असेल. यावेळी श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्र असेल.

Guru Gochar: गुरुच्या स्व नक्षत्र संक्रमणामुळे या राशीच्या लोकांची होणार भरभराट

सोमवार, 13 एप्रिल रोजी सकाळी 5.58 वाजल्यापासून रात्री 1.8 वाजेपर्यंत यावेळी धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र असेल.

सोमवार, 20 एप्रिल रोजी सकाळी 5.51 ते 7.27 वाजेपर्यंत यावेळी रोहिणी नक्षत्र असेल.

शुक्रवार, 24 एप्रिल रोजी सकाळी 5.47 ते सायंकाळी 7.21 वाजेपर्यंत पुष्य नक्षत्र असेल.

बुधवार, 29 एप्रिल रोजी सकाळी 5.42 ते सायंकाळी 7.51 पर्यंत यावेळी हस्त नक्षत्र असेल.

कोणत्या दिवशी वाहनाची खरेदी करू नये

4, 7, 11, 14, 18, 21, 25 आणि 28 एप्रिल रोजी वाहन खरेदी करू नये. याव्यतिरिक्त काही दिवस शुभ दिवस नाही. त्यामुळे या दिवसात खरेदी करणे टाळावे.

April Festival List: हनुमान जयंतीपासून अक्षय तृतीय्यापर्यंत एप्रिल महिन्यात कोणते सण उत्सव येत आहे, जाणून घ्या यादी

एप्रिलमध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी मुहूर्त

मालमत्ता खरेदी करणे एक मोठी गुंतवणूक असते. यामुळे मुहूर्ताचे महत्त्व आणखी वाढते. मालमत्ता खरेदी करण्यासाठी एप्रिलमध्ये काही मुहूर्त आहेत. मालमत्ता खरेदी करण्यासाठी एकूण 6 शुभ मुहूर्त आहेत

गुरुवार, 9 एप्रिल रोजी सकाळी 6.10 ते शुक्रवार, सकाळी 6.2 वाजेपर्यंत यावेळी मूल, पूर्वाषाढ़ा नक्षत्र असेल.

शुक्रवार, 10 एप्रिल रोजी सकाळी 6.1 ते 11.28 पर्यंत पूर्वाषाढ़ा नक्षत्र असेल.

गुरुवार, 16 एप्रिल रोजी दुपारी 1.59 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5.54 पर्यंत रेवती नक्षत्र असेल.

शुक्रवार, 17 एप्रिल रोजी सकाळी 5.54 ते 12.02 पर्यंत रेवती नक्षत्र असेल.

गुरुवार, 23 एप्रिल रोजी सकाळी 5.48 ते रात्री 8.57 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र असेल.

शुक्रवार, 24 एप्रिल रोजी रात्री 8.14 ते दुसऱ्या दिवशी 5.46 पर्यंत आश्लेषा नक्षत्र असेल

मालमत्ता खरेदी कधी करू नये

1 ते 8 एप्रिलपर्यंत मालमत्ता खरेदी करू नये. याशिवाय, ११ एप्रिल ते १५ एप्रिल, १८ एप्रिल ते २२ एप्रिल आणि २५ एप्रिल ते २९ एप्रिल हे दिवस देखील मालमत्ता खरेदीसाठी शुभ नाहीत.

गृहप्रवेश करण्यासाठी शुभ मुहूर्त

एप्रिल महिन्यात गृहप्रवेश करण्यासाठी 2 सर्वोत्तम मुहूर्त आहेत. पहिला मुहूर्त रविवार, 19 एप्रिल या दिवशी अक्षय तृतीय्या आहे. हा दिवस गृहप्रवेश करण्यासाठी शुभ मानला जातो. कारण हा ‘अबुझ मुहूर्त’ आहे. यावेळी गृहप्रवेश केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते.

तर दुसरा मुहूर्त सोमवार, 20 एप्रिल रोजी आहे. या दिवशी वैशाख शुक्ल तृतीया आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: एप्रिल महिन्यात कोणते दिवस शुभ मानले जातात?

    Ans: अक्षय तृतीया, गुरु-पुष्य योग आणि इतर शुभ तिथी वाहन व मालमत्ता खरेदीसाठी उत्तम मानल्या जातात.

  • Que: कोणत्या वारांना वाहन खरेदी करणे शुभ असते?

    Ans: सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस वाहन खरेदीसाठी चांगले मानले जातात.

  • Que: मुहूर्तासोबत आणखी काय करावे?

    Ans: पूजा, नारळ फोडणे, देवाचे स्मरण आणि कुटुंबासोबत शुभारंभ करणे लाभदायक मानले जाते.

Web Title: April shubh muhurat 2026 vehicle property purchase grha pravesh what are the best times to do it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • month
  • religions

संबंधित बातम्या

Surya Nakshatra Parivartan: 31 ऑगस्टपासून या राशींचे सुरू होणार चांगले दिवस, करिअरमध्येही मिळू शकते मोठी संधी
1

Surya Nakshatra Parivartan: 31 ऑगस्टपासून या राशींचे सुरू होणार चांगले दिवस, करिअरमध्येही मिळू शकते मोठी संधी

Shukra Gochar: पुत्रदा एकादशीनंतर शुक्र बदलणार आपले नक्षत्र, तूळ आणि वृषभ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा
2

Shukra Gochar: पुत्रदा एकादशीनंतर शुक्र बदलणार आपले नक्षत्र, तूळ आणि वृषभ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

Kokila Vrat: कोकिळा व्रतामागची पौराणिक कथा काय? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी
3

Kokila Vrat: कोकिळा व्रतामागची पौराणिक कथा काय? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा आणि इतिहास जाणून घ्या
4

Neminath Temple: गिरनार पर्वतावरील नेमिनाथ मंदिराची माहिती, कथा आणि इतिहास जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.