
Hindu Rituals After Death (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिव्यात आत्मा येतो ही खरी भावनाशास्त्रात असं सांगितलं आहे की जेव्हा माणसाचा जीव जातो, तेव्हा शेवटच्या वेळी त्याला जो दिवा ओवाळतात त्या दिव्याच्या ज्योतीत त्याचा आत्मा येतो. म्हणजे तो दिवा त्या गेलेल्या माणसाचंच रूप मानलं जातं. जसे आपण देवपूजेत तांदळाच्या राशीवर देव ठेवतो, तसंच त्या दिव्यासाठी घरात एका जागी पीठ किंवा धान्याचा गोल करुन त्यावर दिवा ठेवला जातो. त्या दिव्याला कधी विझू देता अखंड ठेवला जातो.
पहिल्या दिवशी त्या दिव्याजवळ फक्त पाण्याचा लोटा ठेवतात. दुसऱ्या दिवसापासून रोज जेवणाच्या वेळी थोडा भाताचा पिंड किंवा दुधाची वाटी ठेवली जाते. हे उगाच ठेवत नाहीत. शरीर गेल्यावर आत्मा एका प्रवासाला निघतो, त्या प्रवासात त्याला भूक लागू नये, त्याला शक्ती मिळावी म्हणून ही शिदोरी असते.
असं म्हणतात की माणूस गेल्यावर लगेच त्याला दुसरा देह मिळत नाही. पहिल्या 10 दिवसात रोज केलेल्या पिंडदानाने त्याच्या सूक्ष्म देहाचे अवयव तयार होतात. यालाच अवयव श्राद्ध म्हणतात. 10 व्या दिवशी तो देह पूर्ण तयार होतो आणि मग तो दिवा नदीवर घेऊन जाऊन विसर्जन करतात. तेव्हा तो आत्मा पुढच्या प्रवासाला लागतो.
हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. 10 व्या दिवशी दिवा उचलल्यावर खाली पिठावर काही तरी आकार उमटतो. कोणी म्हणतं माणसाच्या पावलाचा ठसा उमटला म्हणजे परत माणूस होणार, पक्षाच्या पायाचा उमटला म्हणजे पक्षी होणार. पण हे साफ खोटं आहे. खरं तर त्या दिव्याचा तळ हा खडबडीत असतो. 10 दिवस एकाच जागी ठेवल्यावर त्याचा दाब पडून पिठावर रेषा उमटतात. त्याचा आत्म्याशी काहीही संबंध नाही. उगाच त्यावरून घाबरून जायची गरज नाही. योनी ठरवणं इतकं सोपं नसतं.
बऱ्याच वेळा वाऱ्याने किंवा तेल संपल्याने दिवा विझतो आणि घरातले लोक घाबरतात की आता अपशकुन झाला. पण शास्त्रात असं काहीच नाही. दिवा विझला तर लगेच स्वच्छ करून परत लावावा. काहीही दोष लागत नाही.आणि जर मृत्यू परगावी झाला असेल किंवा 10 दिवस दिवा ठेवणं शक्य नसेल तर एकच दिवस दिवा लावला तरी चालतो. शास्त्र हे लोकांना त्रास देण्यासाठी नाही तर गेलेल्या जीवाला शांती मिळावी म्हणून आहे.त्यामुळे या विधीकडे भीतीच्या नजरेने बघू नका. हा गेलेल्या व्यक्तीला प्रकाश दाखवण्याचा आणि त्याला पुढच्या वाटचालीसाठी ताकद देण्याचा एक सात्विक मार्ग आहे.