फोटो सौजन्य- pinterest
भीमसेनी कापूर औषधी गुणधर्मांनी समृद्ध असा मानला जातो. भीमसेनी कापूरला बासर असे देखील म्हटले जाते. त्याचे स्वरुप उष्ण असून त्याचा आकार टोकदार असतो. ज्या लोकांना वात, पित्त आणि कफ यांसारख्या दोषांच्या समस्या असतात त्यांनासंतुलन साधण्यास मदत करते. धार्मिकदृष्ट्या पाहिले गेल्यास कापूर खूप महत्त्वाचे आहे. याचा वापर पूजा आणि हवन मध्ये केला जातो. बरेच लोक संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कापूर जाळतात त्यामुळे घरामधील डास आणि विषाणू यांसारखे घटक दूर होतात. भीमसेनी कापूरने पूजा केल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या
झाडापासून मिळणारा असा हा नैसर्गिक भामसेनी कापूर आहे. त्याचा आकार हा मोठ्या तुकड्यांमध्ये अनियमित आणि किंचित तपकिरी किंवा पिवळसर रंगाचा असा असतो. त्याचा संगुध उबदार असला तरी तो खूप शुद्ध असतो आणि तो पेटवल्यानंतर पूर्णपणे जळतो त्याचे कोणतेही अवशेष राहत नाही. आयुर्वेदिक औषधांमध्ये कापूरचा वापर केला जातो. शास्त्रामध्ये भीमसेनी कापूरचे वर्णन “चक्षुस्य” असा केलेला आढळतो. डोळ्यांना थंडावा देण्यासाठी किंवा डोळे आकर्षक बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो, असे म्हटले जाते. या कापूरमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात यामुळे तुमची त्वचेला होणारी जळजळ, खाज सुटणे आणि पायांना भेगा पडणे असे काही दोष दूर करण्यास भीमसेनी कापूर मदत करते.
असे म्हटले गेले आहे की, भीमसेनी कापूरमुळे पचनाची समस्या सुधारते. भूक वाढण्यास मदत होते आणि पचनाच्या संबंधित इतर काही समस्या असल्यास त्या दूर होतात. कापूर हा श्वासोच्छवासाच्या समस्या कमी करण्यास मदत करतो त्याचबरोबर फुफ्फुसांच्या संसर्गावर उपचार करण्यास देखील उपयुक्त आहे. घरामध्ये भीमसेनी कापूर लावल्याने त्याचा सुंगध घरभर पसरतो तु्म्हाला त्याचा त्रास होत असल्यास कापूर डिफ्यूझर किंवा कापूर बॉक्समध्ये जाळून टाका. तसेच डोके दुखीचा त्रास होत असल्यास नारळाच्या तेलात कापूर मिसळून डोक्याला मसाज करता येईल.
कापूरच्या सुंगधामुळे कीटक दूर होतात आणि हवा शुद्ध करण्यासाठी देखील भीमसेनी कापूर हा एक प्रभावी उपाय आहे. ज्योतिषशास्त्रात म्हटल्याप्रमाणे कापूर घरात जाळल्यास नशिबाची देखील साथ मिळते. घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहते. कापूरच्या सुंगधामुळे मन शांत राहते आणि ताण कमी होतो. तसेच कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट प्रवृत्ती दूर होण्यास मदत होते. असे करणे म्हणजे एक प्रकारे यज्ञ तयार होतो. ज्यामुळे स्थान आणि मन दोन्ही शुद्ध होतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)