फोटो सौजन्य- pinterest
बऱ्याचदा लोक आपल्या घराच्या छतावर हनुमानाचा झेंडा लावतात. हा झेंडा लावल्याने घरात शुभता येते असे मानले जाते. तसेच घरात आनंदाचे वातावरण राहते. घरामध्ये हनुमानाचा झेंडा लावणे योग्य आहे की नाही जाणून घ्या
प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती हवी असते त्यामुळे ते विविध उपाय करत असतात. काहीजण घरामध्ये दररोज पूजा केली जाते, तर काही जण देवी देवतांचे फोटो लावतात, काही जण घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये हनुमानाचा झेंडा लावतात. हा झेंडा लावणे योग्य की अयोग्य ते जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये हनुमानजींचा झेंडा फडकावला जातो म्हणजे त्या घरात राहणाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराला आमंत्रित करत असल्याचे लक्षण मानले जाते. मान्यतेनुसार त्या कुटुंबावर हनुमानाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे त्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तसेच त्या घरामध्ये मानसिक शांती देखील राहते. झेंडा फडकवल्याने घरामध्ये धैर्य, शक्ती आणि विजयाची भावना राहते, असे म्हटले जाते.
झेंडा फडकवताना योग्य दिशेला लावला गेला पाहिजे. असे म्हटले जाते की, झेंडा नेहमी नैऋत्य दिशेला कोपऱ्यामध्ये फडकवावा. ही दिशा स्थिरता आणि सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे वास्तूमध्ये म्हटले गेले आहे. झेंडा एवढ्या उंचीवर लावावा की तो सर्वांना दिसेल आणि त्याची ऊर्जा संपूर्ण घरभर राहील.
झेंड्याचा रंग भगवा असावा त्यामध्ये त्याग, ऊर्जा आणि भक्तीचे प्रतीक आहे.
तसेच त्या झेंड्यावर बजरंगबलीचा चेहरा किंवा पूर्ण चित्र असावा.
जर घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये जुना झेंडा फडकावला असल्यास तो खाली उतरवावा.
दोन त्रिकोण असलेला ध्वज सर्वोत्तम मानला जातो.
मंगळवारचा दिवस बजरंगबलीला समर्पित आहे, म्हणून जर तुम्ही मंगळवारी ध्वज फडकवला तर त्याचा परिणाम आणखी शुभ असतो. हा दिवस धैर्य आणि उर्जेशी संबंधित मानला जातो. ज्यामुळे घराच्या वातावरणात ध्वज फडकवण्याचा परिणाम लगेच दिसून येतो.
बहुतेक घरामध्ये हनुमानजींचा झेंडा फडकवल्यानंतर लोकांना मानसिक शांती मिळाली, घरातील वाद कमी झाले आणि आजारांपासून मुक्तता मिळाली. हा चमत्कार नाही तर श्रद्धेने आणि योग्य दिशेने केलेला धार्मिक कृती आहे, ज्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक विचार आणि विश्वास निर्माण होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)