फोटो सौजन्य- istock
शनिवार, 5 जुलै रोजी चंद्र दिवसा आणि तूळ राशीमध्ये रात्री संक्रमण करणार आहे. चंद्र आणि गुरु यांच्यामध्ये नवम पंचम योग तयार होणार आहे. चंद्र आणि बुध यांच्यामध्ये वसुमान योगदेखील तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रांमध्ये ग्रहाच्या हालचालीनुसार चित्रा नक्षत्रात सर्वार्थ सिद्धी आणि सिद्धी योग तयार होतील. आज आषाढ महिन्याची शुक्ल पक्षाची तिथी आहे. शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीसह इतर काही राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची सर्व प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना फायदा होईल. तुम्ही ज्यामध्ये प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला एखाद्याल ठिकाणांहून पैसे मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमचे नातेसंबंध चांगले राहतील.
कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंददायी राहील. तुमची एखाद्या जुन्या मित्राची ओळख होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी दिवस चांगला आहे. व्यवहार करताना तुमचा दिवस चांगला राहील त्यातून तुम्हाला फायदा होईल. तुमच्यावरील ताण कमी होईल. वाद घालणे टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करत असाल तर तुमचा फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.
धनु राशीच्या लोकांचा आजाच दिवस चांगला राहणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्ही एखाद्या गोष्टींची खरेदी कराल. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करणे टाळा.
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)