
मकर
मकर राशीचे लोक अत्यंत शिस्तप्रिय, संयमी आणि व्यवहारिक असतात. संकटसमयी भावना बाजूला ठेवून परिस्थितीचा शांतपणे विचार करणं ही त्यांची मोठी ताकद आहे. अपयश आलं तरी ते हार मानत नाहीत; उलट पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या ते खूप मजबूत असतात.
वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोक मनाने खूप खंबीर असतात. ते आपलं दुःख किंवा वेदना सहज व्यक्त करत नाहीत, पण परिस्थितीशी झुंज देण्याची क्षमता त्यांच्यात असते. कठीण काळातून सावरून ते पुन्हा नव्याने जगतात त्यांची खासियत आहे. त्यामुळे कोणतंही संकट आलं तरी ही माणसं कोलमडून जात नाहीत.
सिंह
सिंह राशीचे लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात. स्वतःवर असलेला विश्वासच त्यांचा मोठा मानसिक आधार असतो. टीका, अपयश किंवा अडचणी आल्या तरी त्यांचा आत्मसन्मान ढळत नाही. त्यामुळे ते मानसिक दबावाला सहज तोंड देऊ शकतात.
कुंभ
कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारांचे आणि भावनिकदृष्ट्या संतुलित असतात. तणावपूर्ण परिस्थितीतही शांत राहण्याचा प्रयत्न करणं ही त्यांची ओळख आहे. समस्यांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यामुळे ते मानसिक ताण कमी ठेवू शकतात.
धनु
धनु राशीचे लोक आशावादी आणि सकारात्मक स्वभावाचे असतात. आयुष्यातील अडचणींनाही ते शिकण्याची संधी मानतात. सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते लवकर खचत नाहीत आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहतात.
तूळ
तूळ राशीची मंडळी हळव्या स्वभावाची असतात. ही माणसं नात्यांना खूप महत्व देतात. अनेकदा ही मंडळी स्वत:ला डावलून प्रिय व्यक्तींना प्राधान्य देतात. कधी कधी त्यांचा हाच स्वभाव त्यांचा घात करतो. ही मंडळी करिअरमधील चढ उतार सहन करतात पण नातेसंबंधातील चढ उतार यांना झेपत नाही. कोणत्याही नात्यात यांना खरेपणा यांना जास्त महत्वाचा वाटतो. जेव्हा सगळं सहन करण्याच्या पलिकडे जातं तेव्हा स्वाभिमान गहाण नव ठेवता ही माणसं आत्मसन्मासाठी नातं सोडून देण्याची धमक देखील ठेवतात. त्यामुळे ही मनाने हळवी असली तरी कणखर असतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)