Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मन आतले मनातले’ चित्रपटाचा ॲक्शनपॅक्ड टीझर लाँच, उपेंद्र लिमये साकारणार खलनायकाची भूमिका

मराठी चित्रपट सध्या सिनेमागृहात चर्चेत असल्याचे दिसत आहे. आता अशातच आणखी एका मराठी चित्रपटाची भर यामध्ये पडली आहे, ज्याचे नाव आहे 'मन आतले मनातले'. या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 27, 2026 | 10:04 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘मन आतले मनातले’ चित्रपटाचा टीझर लाँच
  • उपेंद्र लिमये साकारणार खलनायकाची भूमिका
  • ‘मन आतले मनातले’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने ठसा उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते उपेंद्र लिमये लवकरच एका वेगळ्या आणि प्रभावी खलनायकच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘मन आतले मनातले’ या ॲक्शनपॅक्ड मराठी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका हे चित्रपटाचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला असून, येत्या १३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जो प्रेक्षकांना सर्व चित्रपटगृहात पाहता येणार आहे.

12.45 कोटींची Rolls-Royce खरेदी केल्यानंतर रॅपर बादशाहचे धक्कादायक विधान; म्हणाला ‘आजही मी किंमत पाहून..’

सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत ‘मन आतले मनातले’ या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली असून, त्यांनीच चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. संवादलेखनाची जबाबदारी मनोज सुधाकर येऊनकर यांनी सांभाळली आहे. तर जेम्स अँथनी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन अभिजित मजुमदार, गीतलेखन डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर, छायांकन सुदर्शन सेनापती, तर संकलन मलया आणि बिपिन यांनी केलं आहे. चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट काम करताना दिसणार आहे.

 

चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट

या चित्रपटात सुरेन महापात्रा, मानसी नाईक, उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरुण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर आणि विनित भोंडे अशी दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि बंगाली चित्रपटांची निर्मिती करणारी सूर्य फिल्म वर्ल्ड ही निर्मिती संस्था या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

‘हा सन्मान आधीच केला असता…’, धर्मेंद्र यांना पद्मविभूषण मिळताच अनिल शर्मा भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाले…

चित्रपटाची काय आहे कथा?

चित्रपटाची कथा एका डॉक्टर दाम्पत्याभोवती फिरते, जे थॅलेसेमिया आणि गिल्बर्ट सिंड्रोम या गंभीर आजारांवर औषध शोधण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांचा मुलगाही या आजारांनी ग्रस्त असतो. अखेर औषधाचा शोध लागल्यानंतर ते त्याचा प्रयोग आपल्या मुलावर करतात. मात्र या प्रयोगानंतर घडणाऱ्या अनपेक्षित घटना कथेला वेगळीच दिशा देतात. त्या औषधाचा परिणाम नेमका काय होतो आणि त्या मुलाचं पुढे काय होतं, हे चित्रपटातून उलगडणार आहे.

प्रत्येक भूमिकेत खणखणीत अभिनय करणारे उपेंद्र लिमये यांची खलनायकी भूमिका या चित्रपटात विशेष लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. टीझरमध्ये दिसणाऱ्या जबरदस्त ॲक्शन सीनमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘मन आतले मनातले’ हा चित्रपट उपेंद्र लिमये यांच्या कारकिर्दीतला एक वेगळा आणि लक्षवेधी चित्रपट असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: The action packed teaser of the marathi movie man aatle manatle has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
2

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
3

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
4

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.