
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी हा शो जसा जसा पुढे जात आहे, तसतसा घरातील खेळ अधिक रंगतदार होताना दिसत आहे. दररोज घरातील स्पर्धकांची समीकरणं बदलताना पाहायला मिळत आहेत. आज जे एकमेकांचे घट्ट मित्र आहेत, तेच पुढच्या एपिसोडमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचं प्रेक्षकांना दिसून येत आहे. बिग बॉस मराठी सीझन 6 चा आता सहावा आठवडा सुरू झाला असून घरात टोळी विरुद्ध झुंड अशी स्पष्ट गटबाजी निर्माण झालेली दिसून आलेली आहे.
या सीझनमधील पहिलं एलिमिनेशन नुकतंच पार पडलं आहे, आणि टोळीमधील सदस्य राधा पाटील घराबाहेर पडली आहे. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच घरात वाद-विवाद आणि धिंगाणा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, कालच्या एपिसोडमध्ये अंडी चोरीच्या प्रकारामुळे ‘बिग बोस’च्या घरात मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकरणात विशालने अंडी चोरल्याचं समोर आल्यानंतर, त्याच्यासाठी कोणीही जेवण बनवणार नाही असा निर्णय घेण्यात आला. त्या आठवड्याचा कॅप्टन आयुष संजीव असून, सर्वांच्या संमतीने त्याने हा निर्णय जाहीर केला होता.
तसेच आता ‘बिग बॉसच्या घरात पुन्हा मोठा राडा होताना दिसत आहे. आजच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा चोरीचा मुद्दा चर्चेत आल्याचे समोर आले आहे. यावेळी विशालचा बॉडी वॉश चोरीला गेला आहे ज्याचे आरोप आयुषवर करण्यात आला आहे. यामुळे संतप्त झालेला विशाल घरात आरडाओरड करताना दिसतो आहे. नंतर तोच बॉडी वॉश कॅप्टन रूममध्ये सापडतो. आणि तो आयुषवर संतापलेला दिसत आहे.
‘मन आतले मनातले’ चित्रपटाचा ॲक्शनपॅक्ड टीझर लाँच, उपेंद्र लिमये साकारणार खलनायकाची भूमिका
यानंतर विशाल कॅप्टन आयुषवरच बॉडी वॉश चोरीचा आरोप करतो. “जसं माझं जेवण बंद केलं, तसं आता कॅप्टन आयुषला काय शिक्षा देणार?” असा सवाल तो घरातील सदस्यांना करतो. मात्र आयुष स्पष्ट करतो की तो बॉडी वॉश अनेक दिवसांपासून तिथेच होता. तरीही विशाल कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नसल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.
हा प्रोमो समोर आल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर भरभरून येत आहेत. सतत होत असलेल्या चोरीमुळे अनेकांनी या सीझनला “चोर सिझन” असं संबोधलं आहे. काही प्रेक्षकांनी आयुष निर्दोष असल्याचं मत व्यक्त केलं आहे, तर अनेकांनी विशालला “नारदमुनी” अशी उपमा दिली आहे. टोळीतील सदस्यांना भडकवण्याचा तो सतत प्रयत्न करत असल्याचंही प्रेक्षकांनी म्हटलं आहे. तसेच आता येणाऱ्या ‘बिग बॉस’च्या पुढील भागात काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.