Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: सोन्याची अंगठी नेमकी कोणत्या बोटात घालावी? काय आहेत नियम

सोन्याची अंगठी दागिना म्हणून परिधान करु नये. ज्योतिषशास्त्रानुसार, सोन्याची अंगठी उजव्या बोटात परिधान केल्याने तुमचे नशीब चमकू शकते. परंतु, चुकीच्या पद्धतीने परिधान केल्यास त्याचा नकारात्मक परिणामाला सामोरे जावे लागू शकत

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 05, 2025 | 12:35 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

सोन्याची अंगठी परिधान करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ती कोणत्या बोटात परिधान करणे शुभ आणि अशुभ आहे. सोन्याचा संबंध सूर्य आणि गुरु ग्रहांशी आहे. यामुळे आपल्या जीवनात, आरोग्यात आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये यश मिळवण्यास मदत करते, अशी मान्यता आहे. जर सोन्याची अंगठी आपण योग्य पद्धतीने बोटात परिधान केल्यास त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळतात.

तर्जनी

जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि अध्यात्म वाढवायचे असेल, तर तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर आहे, कारण ती ज्ञान आणि नेतृत्वासाठी सर्वोत्तम मानली जाते. तर्जनी हे बोट गुरु ग्रहाशी संबंधित आहे, जे गुरु आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.

Astro tips:चांदीची साखळी लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहे का? जाणून घ्या त्याचे फायदे

मधले बोट

मधले बोट शनि ग्रहाशी संबंधित आहे तर सोन्याचा संबंध सूर्याशी आहे, अशी मान्यता आहे. सूर्य आणि शनि यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत, म्हणून या बोटावर सोन्याची अंगठी घातल्याने संघर्ष, अडथळा आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. म्हणून, चुकूनही या बोटात सोन्याची अंगठी परिधान करु नका.

अनामिका

सोन्याची अंगठी अनामिका बोटात परिधान करणे शुभ मानले जाते. अनामिकाचा संबंध सूर्य आणि शुक्र ग्रहाशी आहे. ज्यामुळे आकर्षण, सर्जनशीलता, प्रसिद्धी आणि नेतृत्व क्षमता वाढवते. लग्नानंतर महिला अनेकदा या बोटात अंगठी घालतात, जे एक शुभ चिन्ह आहे.

अंगठा

अंगठ्यामध्ये सोन्याची अंगठी परिधान केल्याने शक्ती, आत्मविश्वास आणि नियंत्रणाचे प्रतीक आहे, परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. परंतु ती जास्त काळ धारण केल्याने व्यक्तीमध्ये अहंकार, हट्टीपणा आणि राग यासारख्या प्रवृत्ती वाढू शकतात. म्हणून, ती मर्यादित काळासाठीच घालावी.

करंगळी

करंगळीचा संबंध बुध ग्रहांशी आहे. जो संवाद, बुद्धिमत्ता, तर्क आणि व्यवसायाचे प्रतीक आहे. जर एखाद्या व्यक्तीला संवादात पारंगत व्हायचे असेल किंवा त्याचे काम बोलणे, लिहिणे किंवा व्यवसाय यांचा समावेश असेल तर करंगळीत सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर ठरू शकते. तसेच करंगळीमध्ये सोन्याची अंगठी परिधान केल्याने निर्णय घेण्यामध्ये स्पष्टता येते, असे मानले जाते.

Astrology: मंगळ आणि शनि दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी करुन बघा ‘हा’ उपाय

लक्षात ठेवा या गोष्टी

ज्योतिषशास्त्रानुसार, उजव्या बोटात सोने घालणे नेहमीच शुभ मानले जाते, विशेषतः पुरुषांसाठी. तर महिला ते दोन्ही हातात घालू शकतात.

सोन्याची अंगठी परिधान करताना ‘ॐ ह्रीम बृहस्पतेय नमः’ या मंत्राचा जप केल्याने शुभ फळं मिळतात.

सोन्याची अंगठी परिधान करण्यासाठी गुरुवार हा शुभ दिवस मानला जातो, परंतु योग्य आणि पात्र ज्योतिषी किंवा पंडितांच्या सल्ल्यानुसार ती रविवारी आणि इतर दिवशी (शनिवार वगळता) देखील घालता येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips wearing gold ring in which finger is auspicious or inauspicious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
1

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष
4

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.