फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक पालकाला वाटत असते की, आपले मुल आनंदी राहावे. मुलाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आणि त्याला सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी पालक अनेक उपाय करत असतात. जसे की, काळा धागा बांधणे, वाईट नजर काढून टाकणे किंवा कपाळावर काजळ लावणे ही सामान्य गोष्ट आहे. पण तुम्हाला माहीत आहे का चांदीची साखळी घातल्याने सुद्धा नजरदोषेपासून मुक्ती मिळू शकते का? जाणून घ्या लहान मुलांना चांदीची साखळी घालण्याचे फायदे
चांदी ही नेहमी थंडपणा आणि शांतीशी संबंधित आहे. असे मानले जाते की, चांदीच्या प्रभावामुळे शरीर आणि मन शांता राहते. जेव्हा एखाद्या मुलाच्या गळ्यात चांदीची साखळी घातली जाते तेव्हा त्याचे मन शांत राहते आणि त्याला चिडचिड किंवा अस्वस्थता वाटत नाही. उन्हाळ्यात त्याचा परिणाम आणखी चांगला दिसून येतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, लहान मुलांना वाईट नजर किंवा नकारात्मक वातावरणाचा परिणाम होतो. लहान मुलांना चांदीची साखळी परिधान केल्याने त्यांचे अशा परिणामांपासून संरक्षण होते. चांदीची साखळी एका संरक्षक कवचासारखे काम करते जी नकारात्मक ऊर्जा मुलापर्यंत पोहोचू देत नाही.
चांदीचा संबंध चंद्राशी मानला जातो. जेव्हा मुलाला चांदीची साखळी परिधान केली जाते तेव्हा कुंडलीतील चंद्राची स्थिती सुधारते. त्यामुळे याचा परिणाम मुलाच्या मानसिक विकास होण्यास मदत होते. मूल शांत राहते, सहज रडत नाही आणि चांगली झोप घेते.
चांदीची चेन परिधान केल्याने मूल मानसिकदृष्ट्या मजबूत होते. मुलाची एकाग्रता आणि त्याच्यातील समजूतदारपणा वाढतो. याचा परिणाम मुलांचा अभ्यास आणि उर्वरित जीवनावर होतो. ज्या मुलांना लवकर राग येतो किंवा लाजाळू असतात त्यांच्यासाठी चांदीची साखळी खूप फायदेशीर मानली जाते.
मुलाला अस्वस्थ वाटू नये म्हणून साखळी खूप जड नसावी.
साखळीची रचना अशी असावी की ती मुलाच्या त्वचेला टोचणार नाही.
चांदीची साखळी दिवसभर घालणे गरजेचे नाही ती काही वेळेसाठी देखील घालता येते.
जर मुल वारंवार तोंडात साखळी घालत असेल तर काही दिवसांसाठी ती घालू नये.
जुर तुम्हाला तुमचे मुल आनंदी शांत आणि सुरक्षित हवे असेल, तर तुम्ही त्याला त्याच्या गळ्यात हलक्या आणि सुंदर चांदीची साखळी घालायला लावू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर, एखाद्या अनुभवी पंडिताला विचारून हे काम शुभ दिवशी करा यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि मुलाच्या जीवनावरही सकारात्मक परिणाम होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)