
फोटो सौजन्य- pinterest
तुळस ही एक वनस्पती नसून ती श्रद्धा आणि अध्यात्माचे प्रतीक आहे. या तुळशी देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. तुळस ही भगवान विष्णूंना देखील खूप आवडते. प्रत्येक घरामध्ये तुळस लावण्याची विविध परंपरा आहे. तुळशीचे दोन रुप मानले जाते. राम तुळशी आणि श्यामा तुळशी. हे दोन प्रकार पडतात. या दोन्ही तुळशीमध्ये रंग, स्वरूप आणि धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहे.
बऱ्याच घरांमध्ये राम तुळशी लावली जाते. तिचा रंग हिरवा असतो आणि ती भगवान श्री रामांशी तिचा संबंध. या तुळशीला शांती, संयम आणि नम्रतेचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की, ही वनस्पती घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि मानसिक शांती मिळते. पूजेमध्ये या तुळशीच्या पानांचा वापर केल्यास ते फायदेशीर ठरते. तसेच या तुळशीचा आयुर्वेदामध्ये देखील उपयोग करणे फायदेशीर सांगितले आहे. म्हणजे या वनस्पतीच्या वापराने सर्दी खोकला, ताप आणि पचनाच्या समस्यांसाठी ही तुळस खूप फायदेशीर आहे.
श्याम तुळशीला कृष्णा किंवा काळी तुळशी असेही म्हटले जाते. तिचा रंग गडद जांभळा असतो आणि ही वनस्पती भगवान श्रीकृष्णाला समर्पित मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, ही तुळशी उग्र स्वरूपाची मानली जाते आणि नकारात्मकता दूर करणारी मानली जाते. या वनस्पतीची पूजा केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. ही वनस्पती भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये अर्पण करणे शुभ मानले जाते. तसेच ही वनस्पती औषधी गुणधर्मानी देखील उपयुक्त अशी आहे. या वनस्पतीच्या वापरामुळे तुम्हाला आजारापासून देखील सुटका होते.
धार्मिक मान्यतेनुसार, घरामध्ये राम तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. हे रोप घरामध्ये लावल्याने सुख-शांती टिकून राहते. त्यासोबत श्याम तुळशी बहुतेकदा जंगलात आढळते. ती औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि अनेक आजारांमध्ये आराम देते.
राम आणि श्यामा तुळशीची दोन्ही झाडे केवळ पूजेसाठीच वापरली जात नाहीत तर याचा वापर आरोग्य आणि पर्यावरणासाठी देखील करणे फायदेशीर मानले जाते. यामध्ये केवळ हवा शुद्ध करत नाहीत तर तणाव आणि नकारात्मक विचारदेखील कमी करतात. म्हणूनच घरात तुळशी असणे शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)